CMRF Maharashtra google
बिझनेस

CMRF Maharashtra: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मोठा डिजिटल बदल; रुग्णांना ८ तासांत मदतीचा निर्णय

Health Scheme: मुख्यमंत्री सहाय्यता निधीत डिजिटल बदलामुळे रुग्णांना ३ ते ८ तासांत मदतीचा निर्णय मिळणार आहे. ऑनलाइन प्रक्रिया, रुग्णालयांकडून कागदपत्र अपलोड आणि CSR निधीमुळे मदत वाढणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

मुख्यमंत्री सहाय्यता निधी (CMRF) पूर्णपणे डिजिटल करण्यात येणार

रुग्णांना ३ ते ८ तासांत मदतीचा निर्णय मिळणार

रुग्णालयेच कागदपत्रे अपलोड करतील, प्रक्रिया सोपी होणार

आजारपणं ही कधीच कोणाला सांगून येत नाहीत. कोणत्याही वेळी आपल्याला आजारपण येतं. त्यावर आपण वेळीच उपचार घेणं गरजेचं आहे. याचाच विचार करुन राज्यातल्या रुग्णांसाठी एक दिलासा देणारी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. यामध्ये मुख्यंमत्री सहाय्यता निधी (CMRF)च्या कार्यपद्धतीत मोठा डिजीटल बदल करण्यात आला आहे. यामध्ये राज्यातील रुग्णांसाठी काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

नव्या प्रणालीमुळे आता रुग्णांना फक्त ३ ते ८ कार्यालयीन तासांत मदतीचा निर्णय कळेल. या उपक्रमाचा शुभारंभ लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लागणारी सगळी कागदपत्रे आणि निर्णय प्रक्रिया आता ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहे.

त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात जाऊन चकरा मारण्याची गरज उरणार नाही. आधी रुग्णांना स्वत: अर्ज करावा लागायचा. आता संबंधित रुग्णालयांनाच रुग्णांची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतील. यासाठी प्रत्येक रुग्णाला त्याचा पर्सनल लॉगिन आणि पासवर्ड देण्यात येईल.

अर्ज अपलोड केल्यावर ३ ते ८ कार्यालयीन तासांच्या आत मदतीचा निर्णय रुग्णालय आणि नातेवाईकांना कळवला जाणार आहे. जर तुम्हाला यामध्ये कागदपत्रं अपलोड करायला उशीर झाला तर पुढच्या दिवशी कार्यालयीन वेळेत तुम्हाला निर्णय कळेल. तसेच निधी देण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. यामध्ये सुरुवातीला ३० टक्के रक्कम दिली जाईल. शिल्लक रक्कम रुग्णाला डिस्चार्ज मिळताना दिली जाईल.

२०२५ या वर्षात या निधीतून तब्बल ४०,७७६ रुग्णांना सुमारे ३३३.६ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)च्या माध्यमातून ही मदत आणखी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानामुळे पशुपालक सापडले संकटात

उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला, राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

IPL सुरू असतानाच टीम इंडियासाठी आली बॅड न्यूज; इंग्लंड, अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांना २ खेळाडू मुकणार

SCROLL FOR NEXT