Children's Day Investment Plan Saam Tv
बिझनेस

Children's Day Investment Plan: बालदिनानिमित्त चिमुकल्यांसाठी अशी करा गुंतवणूक, भविष्यात पैशांची चिंता भासणारच नाही!

Financial Gift For Your Children : वाढत्या वयाबरोबर मुलांचे शिक्षण किंवा लग्नासारखे अनेक खर्च वाढत जातात. त्यामुळे मुलांना भविष्यात कोणत्याही आर्थिक समस्यांना समोरे जावे लागणार नाही.

कोमल दामुद्रे

Child Investment Plan :

बालदिनानिमित्त आपण मुलांसाठी चॉकेलट किंवा त्यांच्या आवडीचे गिफ्ट्स देतो. परंतु, यंदाच्या दिवशी तुम्ही मुलांना काही खास गिफ्ट देऊ शकता. या दिवसानिमित्त तुम्ही त्यांना आर्थिकदृष्ट्या स्थिर करण्यासाठी खूप मदत करेल.

वाढत्या वयाबरोबर मुलांचे शिक्षण किंवा लग्नासारखे अनेक खर्च वाढत जातात. त्यामुळे मुलांना भविष्यात कोणत्याही आर्थिक समस्यांना समोरे जावे लागणार नाही. त्यांसाठी तुम्ही त्यांना बालदिनानिमित्त काही आर्थिक गुंतवणूक करु शकता. मुलांसाठी कोणत्या आर्थिक गुंतवणूक बेस्ट आहेत हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. PPF

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ( PPF )ही अधिक काळ गुंतवणूक करण्यासाठी चांगली योजना आहे. छोट्या गुंतवणूकीसाठी हा बेस्ट पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला चांगला परतावा मिळेल तसेच यात अधिक सवलीतीही मिळतील. या योजनेत गुंतवणूक (Investment Schemes) करताना वर्षाला किमान ५०० रुपये जमा करु शकता. सरकार दर तिमाहीत या योजनेतील व्याजदर ठरवते. सध्या या योजनेत ७.१ टक्के व्याजदर मिळतो आहे.

2. सुकन्या समृद्धी योजना

सुकन्या समृद्धी योजना ही देखील गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. मुलांच्या भविष्यासाठी या योजनेत गुंतवणूक करु शकता. यामध्ये प्रत्येक महिन्याला फक्त २५० रुपये जमा करावे लागतील. भविष्यात ही रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी (Educations) आणि लग्नांसाठी (Marriage) वापरु शकता. सध्या सरकार या योजनेत ८ टक्के व्याजदर देत आहे.

3. म्युच्यअल फंड

म्युच्यअल फंडात गुंतवणूक करणे अधिक जोखीमीचे असते. परंतु, दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा मिळू शकतो. यामध्ये मुलांच्या भविष्यासाठी तुम्हाला अधिक मदत मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT