Petrol Diesel Price (11th October) Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price (11th October) : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, कोणत्या राज्यात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल

Petrol Diesel Price Today 11th October 2023: इस्राइल-हमास युद्धाचा फटका कच्च्या तेलावर दिसून येत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

सणासुदीच्या काळात गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाल्याने सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झाला नाही.

अशातच इस्राइल-हमास युद्धाचा फटका कच्च्या तेलावर दिसून येत आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या युद्धाचा परिणाम भारतावर दिसून येत असल्यामुळे पुन्हा महागाईचा चटका सोसावा लागेल का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे?

सरकारी (Government) तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता नवे दर जाहीर करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत उसळण पाहायला मिळाली त्यामुळे आज बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर $0.09 वरुन 0.10 टक्क्यांनी वाढला यात $87.74 प्रति बॅरल आहे तर WTI क्रूड $0.02 वरुन 0.02 टक्क्यांनी वाढून $85.99 प्रति बॅरल आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत आजही स्थिर आहेत. त्यामुळे आज महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर जिल्ह्यात पेट्रोल (Petrol)-डिझेलचे आजचे दर किती पाहूया.

1. मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९४.२७ रुपयांनी विकले जात आहे.

  • पुण्यात पेट्रोल १०६.१७ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.६८ रुपयांनी विकलं जातंय. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात किचिंत घट झाली आहे.

  • ठाण्यात (Thane) पेट्रोलचा आजचा भाव १०६.०१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२. ५० रुपयांनी विकलं जाईल. पेट्रोल- डिझेलच्या किमतीमध्ये काही पैशांनी आज घसरण पाहायला मिळाली आहे.

  • नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.

2. मोठ्या महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

  • दिल्लीत पेट्रोल ९६.५९ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT