Maharashtra Petrol-Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत आजही मोठी वाढ झाली आहे.दररोज सकाळी ६ वाजता सरकारी कंपन्याकडून कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. काल कच्च्या तेलाच्या किंमतीत आंतरारष्ट्रीय बाजारात वाढ झाली असली तरी राजधानी दिल्लीसह अन्य प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
WTI क्रूड $ 2.06 ने वाढून प्रति बॅरल $ 73.86 वर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 1.95 च्या वाढीसह प्रति बॅरल $ 78.47 वर व्यापार करत आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जून 2017 पूर्वी दर 15 दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.
महाराष्ट्रात (Maharashtra) पेट्रोल 57 पैशांनी तर डिझेल 54 पैशांनी (Price) स्वस्त झालं आहे. पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 44 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी स्वस्त झालं आहे. हरियाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 29 पैशांची घसरण झाली आहे. राजस्थान आणि केरळमध्येही पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले आहे. तेल कंपन्या नफ्यात असल्या तरीही पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत अद्यापह कोणाताही बदल झालेला नाही.
1. चारही महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
मुंबई (Mumbai) पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये मुंबई
कोलकाता पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नईमध्ये पेट्रोल १३२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.