Petrol Diesel Price Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Prices (6th October): टाकी फुल करण्याआधी जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

Petrol Diesel Price Today 6th October 2023: मुंबई-पुण्यात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती?

कोमल दामुद्रे

Petrol Diesel Price in Maharashtra (Marathi):

सरकारने नुकतेच गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार का हा देखील प्रश्न उपस्थित आहे.

महागाईमुळे सर्वसामान्यांचा खिसा अजून रिकामा होणार का? अशी भीती निर्माण झाली आहे. देशाला मागच्या वर्षभरापासून रशियाकडून कमी किमतीत कच्चे तेल मिळत आहे. परंतु, भारतात पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. अशातच कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाची किमत प्रति बॅरल $82.84 आहे तर WTI प्रति बॅरल $80 आहे. देशातील सरकारी कंपन्या इंधनाच्या दरानुसार पेट्रोल-डिझेलचे दर ठरवतात. त्यामुळे प्रत्येक राज्यातील दर वेगळे असतात. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमती या स्थिर आहेत. महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात आज पेट्रोल डिझेलचे भाव किती यावर नजर टाकूया

मुंबई-पुण्यात पेट्रोल-डिझेलसाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबईत पेट्रोल १०६. ३१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.२७ रुपयांनी विकले जात आहे.

  • पुण्यात पेट्रोल १०५.९८ रुपये प्रति लिटर तर डिझेलचा आजचा भाव ९२.५० रुपयांनी विकलं जातंय.

  • ठाण्यात पेट्रोलचा आजचा भाव १०५.८८ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२. ३८ रुपयांनी विकलं जाईल.

  • नागपूरमध्ये पेट्रोल १०६.०४ रुपये प्रति लिटर तर डिझेलसाठी ९२.५९ रुपये मोजावे लागतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई ATS कडून माहिममधून ३३ वर्षीय तरुणाला अटक

Tiger Shroff: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, मास्टरमाइंडचे नाव तपासातून उघड

Diljit Dosanjh: 'बन गईं रील्स, हो गई डिबेट...'; दिल्ली कॉन्सर्टला परवानगी मिळताच दिलजीत दोसांझचा टोला

Aadhar Card : आधार कार्ड हरवलंय? काळजी करू नका! मोबाईलवरून घरबसल्या काही मिनिटांत e-Aadhaar करा डाउनलोड

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात पगार थेट ७२ हजार रुपये होणार? कर्मचारी संघटनांचा मोठा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT