बिझनेस

ChatGPT Go Plan: ₹4,788 किमतीचा ChatGPT Go प्लॅन आता पूर्णपणे मोफत, सबस्क्रिप्शन कसे क्लेम कराल?

Free AI For India: OpenAI ने भारतीय यूजर्ससाठी खास भेट दिली आहे. कंपनीचा ₹३९९ महिना ChatGPT Go प्लॅन आता भारतात पूर्ण वर्षभर मोफत दिला जाणार आहे. योजना ४ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येणार आहे.

Dhanshri Shintre

ही सुविधा कधी उपलब्ध होईल?

४ नोव्हेंबर २०२५ पासून ChatGPT Go भारतात मोफत उपलब्ध होणार असून या तारखेनंतर साइन अप करणाऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. ओपनएआयचे उपाध्यक्ष निक टर्ली यांनी सांगितले की भारतातील अधिकाधिक लोकांना एआयचा(AI) सुलभ अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या, मोफत प्रवेशाची पद्धत कोणती?

ChatGPT Go मध्ये मोफत प्रवेश कसा मिळवायचा?

४ नोव्हेंबरपासून ChatGPT Go मोफत मिळवण्यासाठी यूजर्सनी त्या दिवशी किंवा नंतर साइन अप करणे आवश्यक आहे. नवीन यूजर्ससोबतच आधीचे गो प्लॅन सबस्क्राइबर्सनाही १२ महिन्यांचे मोफत अॅक्सेस दिले जाणार आहे. ओपनएआय लवकरच सध्याच्या सदस्यांसाठी खास रिडेम्पशन प्रक्रिया जाहीर करणार आहे.

ChatGPT Go मध्ये तुम्हाला काय मिळते?

ChatGPT Go प्लॅनमध्ये जरी Plus आणि Pro सारखी सर्व प्रीमियम फीचर्स नसली, तरीही तो यूजर्सना उच्च चॅट मर्यादा, GPT-5 मॉडेलचा प्रवेश आणि सखोल संशोधन करण्याची क्षमता देतो. एआय वापराचा अनुभव घ्यायचा आहे पण जास्त खर्च नको, अशांसाठी ही योजना उत्तम ठरेल.

अधिकाधिक लोकप्रिय होत आहे

भारतामध्ये ChatGPT चा वापर झपाट्याने वाढत आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये Go प्लॅन सुरू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यात भारतातील पेड यूजर्सची संख्या दुपटीने वाढली. वाढत्या प्रतिसादामुळे आणि मागणी पाहता, कंपनीने ChatGPT Go सेवा आता जगभरातील ९० पेक्षा अधिक देशांमध्ये उपलब्ध केली आहे.

नवीन यूजर्सना आकर्षित करण्याचा एक उत्तम मार्ग

भारतामध्ये एआयचा प्रसार वाढवण्यासाठी ओपनएआयने केलेले हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. एका वर्षाच्या मोफत ChatGPT Go अॅक्सेसमुळे नवीन यूजर्स जोडले जातील आणि आधीच्या ग्राहकांनाही अतिरिक्त लाभ मिळेल. मात्र, मोफत सुविधा मिळवण्यासाठी ४ नोव्हेंबर नंतर वेळेत साइन अप करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Manoj Jarnage: बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा, सरकारला दिला इशारा| VIDEO

Gold Price: 'या' १० कारणांमुळे सोनं होतेय स्वस्त; दिवाळीनंतर तब्बल ₹१०,३७० नी घसरण, आता गोल्ड खरेदी करणं योग्य?

Winter Lip Care: कोरड्या हवेमुळे ओठ काळे पडतायेत? जाणून घ्या 'हे' घरगुती उपाय

Local Body Election : राज्यातील निवडणुकीसाठी आयोगाचा नवा प्लान, तब्बल २०० कोटींचा खर्च वाढला, आचारसंहिता कधी लागणार?

SCROLL FOR NEXT