Vivo Y02t Saam Tv
बिझनेस

Vivo चा जबरदस्त फोन 7500 पेक्षा कमी किंमत खरेदी करण्याची संधी; Amazon ची लिमिटेड टाईम डील

Vivo Y02t News: जर तुम्ही 7,500 रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Amazon ने एक लिमिटेड टाईम डील आणली आहे.

Satish Kengar

Vivo Y02t:

जर तुम्ही 7,500 रुपयांच्या बजेटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असला तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. Amazon ने एक लिमिटेड टाईम डील आणली आहे. यात तुम्ही बंपर ऑफरमध्ये 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह Vivo Y02t स्मार्टफोन खरेदी करू शकता.

सेलमध्ये फोनची किंमत 7,499 रुपये झाली आहे. तुम्ही हा फोन 364 रुपयांच्या EMI वर देखील खरेदी करू शकता. फोनवर 7,050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही दिला जात आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती, ब्रँड आणि कंपनीच्या एक्सचेंज पॉलिसीवर अवलंबून असेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vivo च्या या स्वस्त फोनमध्ये 1600x720 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.51 इंच HD + डिस्प्ले आहे. हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज पर्यायात येतो. प्रोसेसर म्हणून यात MediaTek Helio P35 चिपसेट आहे. कंपनी फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर देखील देत आहे. याच्या मदतीने फोनची एकूण रॅम 8 GB पर्यंत वाढते. (Latest Marathi News)

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील भागात 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 10 वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

हा फोन Android 13 वर आधारित Funtouch OS 13 OS सह येतो. कॉस्मिक ग्रे आणि सनसेट गोल्ड कलर पर्यायांमध्ये येत असलेल्या या फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, यूएसबी 2.0, जीपीएस आणि ड्युअल सिम सपोर्टसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT