Big GST Relief Saam tv news
बिझनेस

GST Relief: मध्यमवर्गीयांना दिलासा! पोरांच्या वह्या, तेल... काय काय स्वस्त होणार? संपूर्ण यादी एका क्लिकवर

GST changes 2025: १२% GST स्लॅब हटवण्याची शक्यता, त्यामुळे वह्या, टूथपेस्ट, केसांचं तेल, स्वयंपाक भांडी, चप्पल यांसारख्या वस्तू स्वस्त होणार. सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता.

Bhagyashree Kamble

१२ लाख रुपयांचे उत्पन्न करमुक्त करत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर लागोपाठ ३ वेळा आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करत खुशखबर दिली. आता या आनंदात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून जीएसटीच्या स्लॅबमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून १२ टक्क्यांचा जीएसटी स्लॅब हटवण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सध्या ०%, ५% , १२ %, १८ % आणि २८ % असे जीएसटीचे पाच स्लॅब आहेत. यामधील १२% हा स्लॅब बंद करण्यात येऊ शकतो किंवा त्यामधील अनेक वस्तूंना ५% स्लॅबमध्ये टाकण्यात येऊ शकते. केंद्र सरकारने हा बदल केल्यास दररोजच्या वापरातील वस्तू स्वस्त होणार आहेत. टूथपेस्ट, केश तेल ते चप्पल, स्टेशनरी वस्तू अन् लस्सी यासारख्या वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोण कोणत्या वस्तू स्वस्त होऊ शकतात...

१२ टक्के GST अंतर्गत येणाऱ्या दररोजच्या वापरातल्या वस्तू :

टूथ पावडर :(दात घासण्याची पावडर)

सॅनिटरी नॅपकिन्स : (याच्यावर सध्या0% GST आहे, पण इतर काही स्त्रियांसाठीच्या स्वच्छता वस्तूंवर 12% GST आहे)

केसांचे तेल: रोज वापरले जाणारे हेअर ऑइल.

साबण : काही प्रकारची साबण (काही साबणांवर 18% GST आहे).

टूथपेस्ट: काही ब्रँडेड टूथपेस्ट (काहींवर 18% GST आहे).

छत्री :

शिलाई मशीन : कपडे शिवण्यासाठी वापरली जाणारी मशीन.

पाण्याचे फिल्टर : विजेवर न चालणारे वॉटर फिल्टर आणि प्युरिफायर.

प्रेशर कुकर: स्वयंपाकासाठी वापरले जाणारे.

स्वयंपाकाची भांडी : अॅल्युमिनियम, स्टीलची काही भांडी (काहींवर 12% GST आहे).

इलेक्ट्रिक इस्त्री :

वॉटर हिटर (गिझर):

व्हॅक्यूम क्लिनर: छोट्या क्षमतेची, घरगुती वापरासाठी.

वॉशिंग मशीन:

सायकल:

अपंगांसाठीच्या गाड्या

पब्लिक ट्रान्सपोर्ट वाहने: विक्रीसाठी (प्रवासाच्या भाड्यावर नाही).

रेडिमेड कपडे: 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे.

फुटवेअर: 500 ते 1,000 रुपये किमतीचे बूट.

लसी, लोणी, तूप : बऱ्याच लसींवर 12% GST तो कमी होऊ शकतो.

डायग्नोस्टिक किट: HIV, हिपॅटायटिस, टीबी यांसाठी चाचणी किट.

आयुर्वेदिक आणि युनानी औषधे: काही खास प्रकारची औषधे.

वह्या :

ज्योमेट्री बॉक्स :

नकाशे आणि ग्लोब: शैक्षणिक वापरासाठी.

ग्लेझ्ड टाइल्स : साध्या, नॉन-लक्झरी टाइल्स.

रेडी-मिक्स काँक्रीट (बांधकामासाठी तयार मिश्रण)

प्री-फॅब्रिकेटेड इमारती :

शेतीची उपकरणे (यांत्रिक थ्रेशरसारखी उपकरणे)

पॅकेज्ड खाद्यपदार्थ : कंडेन्स्ड मिल्क, गोठवलेल्या भाज्या (काही प्रकार).

सोलर वॉटर हिटर :

मोबाईल -

बदाम, फळांचा रस, भाज्या, फळे, लोणचे, मुरांबा, चटणी, जाम, जेली, नारळ पाणी

हॉटेल रुम, (प्रति रात्र भाडे ७५०० रुपयांपर्यंत),नॉन इकोनॉमिक क्लास (हवाई प्रवास)

सरकारवर किती कोटींचा बोजा पडणार ?

रिपोर्ट्सनुसार, १२ टक्क्यांचा स्लॅब कमी केला अथव काही वस्तू ५ टक्क्यांमध्ये नेल्या तर केंद्र सरकारला ४० हजार ते ५० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. जीएसटीममुळे वस्तू स्वस्त झाल्यास विक्रीमध्ये वाढ होईल अन् जीएसटी संकलन मोठ्या प्रमाणात होईल, असा अंदाज बांधला जातोय. कमी किमतीमुळे विक्री वाढेल, ज्यामुळे कराचा आधार वाढेल आणि दीर्घकालीन दृष्टिकोनातून GST संकलनात वाढ होईल. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी GST दरांमध्ये संभाव्य बदलांचे संकेत दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांची रांग

Maharashtra Politics: बाहेर ये...तो राज साहेबांविषयी बोललाय; राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरणाऱ्याला मनसेनं बदडलं|VIDEO

Badlapur Firing : बदलापूर हादरलं! दिवसाढवळ्या आमदाराच्या बंगल्यासमोर गोळीबार

Wada News : आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष थांबेना; रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा नदीत तराफ्यातून जीवघेणा प्रवास

Raj Thackeray: झेंडा, स्कार्फ, पक्षचिन्ह काहीच नको; मोर्चाला येण्याआधी राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश

SCROLL FOR NEXT