केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारने नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरु केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेची दुसरी आवृत्ती सुरु करताना केंद्र सरकारने लाभार्थ्यांना कर्ज देणाऱ्या संस्था आणि बँकांशी करार केले आहेत. (Government Scheme)
केंद्र सरकारने पीएम आवास योजनेवर भर दिला आहे. अल्प उत्पन्न गटाव्यतिरिक्त मध्यमवर्यीग लोकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना केंद्र सरकार १.८० लाख रुपयांपर्यंत व्याज अनुदान देणार आहे.
सरकारने पंतप्रधान आवास योजनेसाठी एक पोर्टलदेखील सुरु केले आहे. गृहनिर्माण आणि शहरी मंत्रालयाने केलेल्या या पोर्टलद्वारे पंतप्रधान आवास योजना लागू केली जाईल. त्यामुळे तुम्ही आता पोर्टलवरुनदेखील अर्ज भरु शकणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या पोर्टलमुळे अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया सोपी झाली आहे. अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती कळू शकणार आहे. या योजनेत अंमलबजावणीत सहभागी असलेले सर्वजण आपला डेटा शेअर करु शकणार आहेत.या योजनेच्या अंबलबजावणीची प्रक्रिया जास्त वेगवान होणार आहे. याचसोबत केंद्रिय स्तरावरदेखील देखरेख ठेनवली जाणार आहे. (PM Awas Yojana)
प्रधानमंत्री आवास योजना कधी सुरु झाली? (PM Awas Yojana News)
प्रधानमंत्री आवास योजना ही २५ जून २०२५ रोजी सुरु करण्यात आला. गरीब कुटुंबातील सदस्यांना कायमस्वरुपी घरे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली. या योजनेत गरिबांना घरे बांधण्यासाठी मदत केली जाणार आहे. या घरांना वीज आणि पाणी पुरवठ्याची व्यवस्थादेखील सरकार करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.