Bank Recruitment SAAM TV
बिझनेस

Bank Recruitment : खूशखबर! सेंट्रल बँक ऑफ इंडियात मोठी भरती, ४८४ पदे; असा कराल अर्ज!

Bank Recruitment News : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध आहे. ४५० हून अधिक पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

Shreya Maskar

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. ४५० पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदे स्वच्छता कर्मचारी आणि उप कर्मचाऱ्यांची आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट वरील रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून अर्ज भरावा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या पदांची भरती खूप पूर्वी जाहीर केली होती आणि त्याचे अर्जही बंद झाले होते. आता पुन्हा एकदा या पदांसाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. २१ जून पासून ते २७ जून पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. २७ जून शेवटची तारीख आहे. एडिट विंडो सुद्धा २१ जून रोजी उघडेल आणि २७ जून रोजी बंद होईल.

या रिक्रूटमेंटच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकूण ४८४ पदे भरली जाणार आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सफाई कर्मचारी पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा आयबीपीएसद्वारे घेतली जाईल. तर स्थानिक भाषा परीक्षा बँकेद्वारे घेतली जाईल. परिक्षेच्या गुणवत्तेवर निवड आधारित असेल. ऑनलाइन परीक्षा ७० गुणांची तर स्थानिक भाषा चाचणी ३० गुणांची असेल.

जनरल कैटेगरी मधील लोकांना या पदासाठी अर्ज करायला असल्यास ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST, PH आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागेल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple कडून मोठा धमाका होणार; नव्या वर्षांत महत्वाची घोषणा करणार

भारतीय क्रिकेटपटूची बहीण लेस्बियन? नेमकं प्रकरण काय? चहर का भडकला?

Pune Navale Bridge Accident: ब्रेक फेल की घातकी ब्रीज? नवले पुलावरील अपघात कशामुळे झाला? दुर्घटनेबाबत RTO चा धक्कादायक अहवाल

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT