गुढीपाडव्याला आपण घरात नवीन वस्तू खरेदी करतो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या सणाच्या दिवशी मुंबईत इलेक्ट्रीक वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली आहे.
गुढीपाडव्यानिमित्त (Gudi-padva) सोने, घर, वाहन, इलेक्ट्रिक वस्तू यांच्या खरेदीसाठी बाजारात अधिक गर्दी पाहायला मिळाली. मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलच्या केवळ आठ दिवसात २८३७ घरांची विक्री झाली. तर इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles), गृहोपयोगी वस्तू यांच्यावर जाहीर करण्यात आलेल्या सवलतीने ग्राहकांना भुरळ घातली.
गुढीपाडव्यानिमित्त वाहनांच्या खरेदीला १ एप्रिलपासूनच सुरुवात झाली आहे. मुंबईतील बोरिवली, वडाळा, अंधेरी आणि मुंबई सेंट्रल या चार आरटीओमधून ७,९९७ वाहन खरेदीची नोंद करण्यात आली. यामध्ये ४,५०७ दुचाकी आणि ३०३० चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
१ ते ९ एप्रिल या कालावधीत वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक अर्थात २,१९६ वाहने नोंदणी केली असून यात १,३६७ दुचाकी तर ६५३ चारचाकी आणि ५५ रिक्षा यांचा समावेश आहे. बोरिवली आरटीओमधून २,१४८ वाहनांची नोंदणी झाली असून १,२८० दुचाकी, ६५३ चारचाकी आणि रिक्षा ९८ यांचा समावेश आहे.
मुंबई सेंट्रल आरटीओमध्ये १,९२० वाहनांची नोंदणी केली असून यात ९५७ दुचाकी आणि ८२४ चारचाकी आहेत. अंधेरी आरटीओमधून १,६९३ वाहने नोंदणी झाली असून ९०० दुचाकी, ६७० चारचाकी आणि ५७ रिक्षा यांचा समावेश आहे. तर मुंबई सेंट्रल आरटीओ क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे ८२४ चारचाकींची नोंद करण्यात आली आहे.
वर्षभरात धनत्रयोदशी, दिवाळी (Diwali), दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय्य तृतीया यांसारख्या सणानिमित्त इलेक्ट्रिक वाहने, नवीन घर आणि सोन्या-चांदीत अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जाते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.