BYD Seal EV launched in India Saam Tv
बिझनेस

Electric Car: मुंबई-सातारा-मुंबई एका चार्जमध्ये गाठते BYD ची नवीन इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत

BYD Seal EV launched in India: जगभरात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या चिनी कार उत्पादक कंपनी BYD आपली बहुप्रतिक्षित सेडान Seal भारतात लॉन्च केली आहे.

Satish Kengar

BYD Seal EV launched in India:

जगभरात इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या चिनी कार उत्पादक कंपनी BYD आपली बहुप्रतिक्षित सेडान Seal भारतात लॉन्च केली आहे. e6 MPV आणि Atto 3 SUV नंतर BYD सील हे भारतातील चिनी कार उत्पादक कंपनीचे तिसरे मॉडेल आहे.

BYD ने सीलसाठी 1.25 लाख रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग सुरू केली आहे. ही कार 31 मार्च 2024 पूर्वी बुक केल्यास ग्राहकांना अनेक अतिरिक्त फायदे कंपनीकडून दिले जात आहे. ग्राहकांना कारमध्ये जबरदस्त रेंज मिळते. ही कार एकदा चार्ज केल्यावर तुम्ही मुंबई ते सातारा आणि पुन्हा सातारा ते मुंबईत परत येऊ शकता. यातच याची रेंज, किंमत आणि फीचर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन BYD सील 61.44kWh आणि 82.56kWh या दोन बॅटरी पर्यायांसह येते. कारच्या दोन्ही बॅटरी BYD च्या पेटंट ब्लेड तंत्रज्ञानावर आधारित आहेत. याची 61.44kWh बॅटरी ग्राहकांना 510 किमीची रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे. ही बॅटरी 204bhp ची पॉवर आणि 310Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. मोठी 82.5kWh बॅटरी RWD आणि AWD प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.  (Latest Marathi News)

सिंगल मोटर RWD 312bhp ची पॉवर आणि 360Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तर ड्युअल-मोटर AWD कॉन्फिगरेशनमध्ये ते 530bhp ची पॉवर आणि 670Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बॅटरी पॅकमध्ये ग्राहकांना 650 किमीची रेंज मिळेल, असा दावाही कंपनीने केला आहे.

कार 5-स्टार सेफ्टी रेटिंगने सुसज्ज

कारच्या आतील भागात ग्राहकांना 15.6-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. तर कारच्या केबिनमध्ये 10.25 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील देण्यात आला आहे. याशिवाय वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 10 एअरबॅग्ज, ऑटोमॅटिक वाइपर, 360 डिग्री कॅमेरा, ADAS तंत्रज्ञानासह फॅमिली सेफ्टीत कारला Euro NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाली आहे.

किती आहे किंमत?

नवीन इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप मॉडेलसाठी 53 लाख रुपयांपर्यंत जाते. याच्या बेस डायनॅमिक व्हेरिएंटची किंमत 41 लाख रुपये आहे. तर प्रीमियम व्हेरिएंटची किंमत 45.5 लाख रुपये आहे आणि परफॉर्मन्स व्हेरिएंटची किंमत 53 लाख रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan 2025 : श्रावण महिना कोणत्या तारखेपासून सुरु होतोय?

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या उगले दाम्पत्याला शासकीय पूजेचा मान, CM फडणवीसांनी दिलं मोठं गिफ्ट

‘गब्बर के ताप से आपको सिर्फ गब्बरही बचा सकता है’; शिवसेनेच्या बड्या नेत्याचं एकनाथ शिंदेंना पत्र

Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

Maharashtra Live News Update: प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायणगडावर भक्तांनी घेतले विठुरायाचे दर्शन

SCROLL FOR NEXT