दिवाळी या सणात अनेक गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याचा विचार करतात. काही लोक धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करतात. पूर्वीपासूनच सोनं खरेदी करण्यासाठी धनत्रयोदशी हा दिवस उत्तम मानला जातो.
परंतु, बदलेल्या काळानुसार गुंतवणूकीचे अनेक पर्याय समोर आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याव्यतिरिक्त अनेक इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. जर तुम्ही देखील सोन्यासोबत इतर गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या पर्यांयाचा विचार करा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. डिजिटल गोल्ड
हल्ली लोकांना फिजिकल गोल्डपेक्षा (Gold) डिजिटल गोल्डचा पर्याय अधिक प्रमाणात आवडू लागला आहे. दागिने बनवताना त्यावर मेकिंग चार्जेस देखील लावले जातात. ज्याचा परतावा आपल्याला कमी मिळतो. परंतु, डिजिटल गोल्ड या स्वरुपात नसते. त्यामुळे आपण कमी पैशांमध्ये हे खरेदी करु शकतो.
2. गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF)
गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड हे देखील फिजकिल गोल्ड प्रमाणेच आहे. हे दागिन्याच्या स्वरुपात मिळणार नाही. हे आपल्याला इलेक्ट्रॉनिक स्वरुपात मिळते. याचा सगळ्यात मोठा फायदा की, हे आपल्याला शेअर बाजाराच्या ट्रेडिंगवर मिळते. NSE, BSE आणि ETF च्या स्वरुपात खरेदी (Shopping) करता येते. तसेच यामध्ये सोन्याची शुद्धता तपासावी लागत नाही. यामध्ये आपल्याला किमान १ ग्रॅम इतके सोने खरेदी करावे लागते.
3. गोल्ड म्युचुअल फंड (Gold Mutual Funds)
गोल्ड म्युचुअल फंड हे सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय आहे. ही एक ओपन एंडेड गुंतवणूक आहे, जी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. यामध्ये तुम्ही 500 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये अधिक काळपर्यंत चांगला परतावा मिळतो. जर गुंतवणुकीचा कालावधी 3 वर्षांपेक्षा जास्त असेल. रिटर्नही चांगले मिळतात.
4. सॉवरेन गोल्ड बॉन्ड(Sovereign Gold Bond)
RBI ने जारी केलेल्या सॉवरेन गोल्ड बॉन्ड हे सोन्यात गुंतवणूक करण्याचे अतिशय सुरक्षित माध्यम आहे. तुम्ही हे सोनं बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि स्टॉक एक्सचेंज NSE, BSE द्वारे खरेदी करू शकता. तुम्ही यासाठी UPI द्वारे डिजिटल पेमेंट करू शकता. तसेच तुम्ही पेमेंटसाठी रोख रकम (Price), चेक किंवा ड्राफ्ट देखील देऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.