Home loan Saam tv
बिझनेस

Home loan : 'ड्रीम होम' खरेदी करणे आणखी सोपं होणार; रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीचा कर्जात समावेश होणार?

कोमल दामुद्रे

Can Registration Charges Included in Home Loan :

घर खरेदी करणाऱ्या लवकरच दिलासा मिळणार आहे. मुंबईसारख्या शहरात घर खरेदी करताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ येतात. अशातच वाढती महागाई, पैशांचा अभाव यामुळे घर खरेदी करताना गृहकर्जाशिवाय आपल्याकडे कोणतेच पर्याय नसतात.

घर खरेदी करताना आपल्याला त्याच्या असणाऱ्या किमतीबरोबरच स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जेस भरावे लागतात. त्यामुळे विकत घेतलेल्या किमतीपेक्षा आपल्याला अधिक किमत मोजावी लागते. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार आता बँक आता स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जेस शुल्क देखील कव्हर करु शकते. यामुळे ग्राहकांना गृहकर्ज भरताना दिलासा मिळणार आहे.

परंतु, अद्यापह भारतीय रिझर्व्ह बँकेला कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जेस आणि इतर खर्चावरही गृहनिर्माण प्रकल्पाच्या खर्चात समावेश करावा लागेल असे बँकांनी त्यांच्या प्रस्तावात म्हटले आहे. यावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

1. घर खरेदीसाठी (Home Buying) बँक देणार अधिक पैसे

गृहकर्जसाठी आरबीआय लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ शकते अशी माहीती मिळाली आहे. त्यामुळे खरेदीदारांना दिलासा मिळेल. तसेच बँकाना (Bank) यामुळे कोणताही धोका होणार नाही. जर आरबीआयने 1 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी 20 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि रेजिस्ट्रेशन चार्जेससह गृहकर्ज मंजूर केल्यास, कर्ज घेणाऱ्या ग्राहकाला सध्याच्या 60 लाख रुपयांऐवजी 75 लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते.

2. सध्या कर्ज किती मिळते?

आरबीआयचे सध्याचे कर्ज ते मूल्य गुणोत्तर मालमत्तेच्या किंमतीच्या 75-90 टक्क्यांपर्यंत आहे. जर कर्जाची रक्कम (Price) 75 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर कर्ज ते मूल्य प्रमाण 75 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. सुमारे 10 वर्षांपूर्वी, आरबीआयने गृहकर्जामध्ये स्टॅम्प ड्युटी, रेजिस्ट्रेशन आणि इतर खर्च समाविष्ट न करण्याचे निर्देश दिले होते. यावर अंतिम निर्णय आरबीआयाला घ्यावे लागेल.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अहवालात म्हटले आहे की, मार्च 2023 पर्यंत, निवासी युनिट्सशी संबंधित कर्ज एकूण कर्जाच्या 14.2 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मार्च 2012 मध्ये हाच आकडा केवळ 8.6 टक्के होता. आकडेवारीनुसार, मार्च 2023 पर्यंत बँकिंग व्यवस्थेतील रिअल इस्टेटचा वाटा 16.5 टक्के होता. या काळात गृहकर्जाचे हप्ते चुकवण्याचे प्रमाणही दोन टक्क्यांपेक्षा कमी नोंदवले गेले आहे.

3. या महिन्यात येणार नवीन व्याजदर

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, शहरांमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना गृहकर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठी सप्टेंबरमध्ये एक योजना आणली जाईल. त्यांच्या म्हणण्यानुसार सध्या या योजनेचे स्वरूप तयार केले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : रोजच्या भांडणांमुळे नातं तुटण्याची भीती वाटतेय? आजपासून 'या' टिप्स नक्की फॉलो करा

IND vs BAN: कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोठा खुलासा; पहिल्या सामन्यात 'हा' फलंदाज करणार ओपनिंग!

Marathi News Live Updates : डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

Walnut Benefit: दररोज अक्रोड खाण्याचे चमत्कारिक फायदे

Ladki Bahin Yojana : बँकांची चूक झाली की काय? महिलांच्या खात्यात जमा होतायत ४५०० रुपये, वाचा खरं कारण

SCROLL FOR NEXT