Rakhi Business Saam Tv
बिझनेस

Business Idea: लवकर सुरु करा राखीचा बिझनेस; रक्षाबंधनापूर्वी व्हाल लखपती

Business Idea Of Making Rakhi For Rakshabandhan: रक्षाबंधननिमित्त तुम्ही राखी बनवण्याचा बिझनेस सुरु करु शकतात. राखी बनवण्याच्या बिझनेसासाठी तुम्हाला जास्त भांडवलाचीही गरज नसते. या बिझनेसमधून तुम्ही लखपती होऊ शकतात.

Siddhi Hande

येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण देशभरात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. रक्षाबंधनच्या दिवशी बहीण भावा ओवाळते अन् राखी बांधते.रक्षाबंधनाच्या दिवशी राखीला विशेष महत्त्व असते. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही राखीचा व्यवसाय करु शकतात. राखीचा व्यवसाय करुन तुम्ही काही दिवसांतच लखपती होऊ शकतात.

सध्या चीनमधून भारतात वेगवेगळ्या राख्या आयात केल्या जातात. यातून ते लोक कोट्यवधी रुपये कमावतात. परंतु आता मेड इन इंडिया राखी भारतात मिळायला सुरुवात केली झाली आहे. तुम्हीही तुमच्या घरी राख्या बनवून त्याचा व्यवसाय करु शकतात. हा व्यवसाय करण्यासाठी सुरुवातीला जास्त भांडवलाचीही गज नसते.

राखी बनवण्याच्या बिझनेससाठी किती खर्च येणार?

राखी बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी जास्त भांडवलाची गरज नसते. हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त २०,००० ते ५०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. राखी बनवण्यासाठी तुम्हाला रेशमी धागा, मोती, पेपर, सजावटीचे सामान, वेगवेगळे स्टिकर्स आणावे लागतील. हे सामान तुम्ही होलसेल मार्केटमधून आणू शकतात. होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला कमी किंमतीत हे सामान मिळेल. हा बिझनेस सुरु करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या मशीनची गरज भासणार नाही. तुम्ही तुमच्या घरी हाताने वेगवेगळ्या डिझाइनची राखी बनवू शकतात. तुमच्या आयडिया वापरुन तुम्ही वेगवेगळ्या राख्या तयार करु शकतात. तुमची राखी जर युनिक असेल तर त्याला मार्केटमध्ये जास्त मागणी असेल.त्यामुळे तुमची चांगली कमाई होईल. लहान मुलांसाठी तुम्ही वेगवेगळे कार्टु, सुपरमॅनचे स्टिकर्स लावून राखी बनवू शकतात.

घरी बनवलेल्या राख्या तुम्ही सोशल मीडियाद्वारेदेखील विकू शकतात. तुम्ही सोशल मीडियावर राखीच्या बिझनेससाठी स्वतः चे पेज बनवा. त्यावरुन तुम्ही तुमच्या बिझनेसची मार्केटिंग करु शकतात. सध्या बाजारात एका राखीची किंमत ५०-१५० रुपये आहे. या बिझनेसमध्ये तुम्हाला ४० ते ५० टक्के नफा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apple cutting Tips: सफरचंद कापल्यानंतर काळे का पडतात?

Bridal Look Care: या ५ चुकांमुळे नेहमी खराब होतो ब्राइडल लूक...; तुमचं लग्न जर यावर्षी ठरलं असेल तर घ्या ही काळजी

Ginger Garlic Paste: मीठ आणि तेल वापरून बनवा आलं- लसूणाची पेस्ट, दिर्घकाळ टिकेल

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Maharashtra Politics: शिवसेनेत उलथापालथ! भास्कर जाधवांच्या निकटवर्तीयाची ठाकरे गटातून हकालपट्टी; कोकणात राजकीय भूकंप

SCROLL FOR NEXT