Employee Salary Hike meta ai
बिझनेस

Budget 2027: पगार ४२ हजार अन् ग्रॅच्युइटी ४० लाख! बजेट २०२७ मध्ये कर्मचाऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट?

Employee Salary Hike: कर्मचारी संघटनांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२७ आधी महिन्याचा पगार ४२ हजार रूरपये करण्याची मागणी केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

Budget 2027: केंद्रीय अर्थसंकल्प २०२७ सादर होण्याआधी देशातल्या कर्मचारी संघटनांनी केंद्र सरकारकडे अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यामध्ये कर्मचाऱ्यांचे किमान मासिक वेतन ४२ हजार रुपये करण्यापासून ते ग्रॅच्युइटीची मर्यादा ४० लाख रुपये करण्यापर्यंतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. तसेच आशा सेविका, अंगणवाडी कर्मचारी आणि गिग वर्कर्ससाठीही आर्थिक मदतीची मागणी केली. मात्र या मागण्या आहेत, त्यावर सरकारने अजून कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही.

ग्रॅच्युइटीची मर्यादा ४० लाख करण्याची मागणी

सध्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा २० लाख रुपये आहे. ही वाढवून ४० लाख रुपये केली पाहिजे, अशी मागणी ट्रे़ड युनियनने केली. तसेच ग्रॅच्युइटीचं गणित करताना प्रत्येक पूर्ण वर्षाच्या सेवेसाठी १५ दिवसांपेक्षा २१ दिवसांचं वेतन गृहीत धरावं, असाही प्रस्ताव आहे. त्यामुळे रिटायरमेंटच्या वेळी कर्मचाऱ्यांना जास्त रक्कम मिळू शकते.

बेसिक सॅलरी ४२ हजार रुपये करण्याचा प्रस्ताव

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU) या संघटनेने देशातल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी महिन्याची सॅलरी ४२ हजार रुपये ठरवण्याची मागणी केली. वाढती महागाई आणि रोजच्या खर्चाचा विचार करून वेतन वाढवणं गरजेचं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. तसेच नोव्हेंबर २०२५ मध्ये लागू झालेल्या चार नवीन कामगार संहिता मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली.

गिग वर्कर्ससाठी विमा आणि सामाजिक सुरक्षा

डिलिव्हरी पार्टनर आणि इतर गिग वर्कर्सना आरोग्य विमा आणि अपघात विम्याचा लाभ मिळावा, यासाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा निधी तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. या निधीत ऑनलाइन प्लॅटफॉर्म कंपन्यांनीही योगदान द्यावं, अशी मागणी केली. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांनाही या सुविधांचा लाभ मिळावा, असं सुचवण्यात आलं.

आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ?

ट्रेड युनियनने आशा आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी केली. त्यानुसार आशा सेविकांना दर महिन्याला १० हजार रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना १५ हजार रुपये आणि मदतनीसांना १२ हजार रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव आहे. या सर्व मागण्या २० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या अर्थसंकल्पा आधीच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर मांडण्यात आल्या. आता अर्थसंकल्प २०२७ मध्ये सरकार यापैकी कोणत्या मागण्यांना मंजुरी देते, याकडे कर्मचारी आणि कामगारांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : मुंबईत धावत्या लोकलमध्ये थरार, प्रवाशावर धारदार शस्त्राने हल्ला; धक्कादायक कारण समोर

Congress: मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसचा मोठा निर्णय, सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या स्थगित

Maharashtra News Live Update: सुनेत्रा पवार यांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीकडून निषेध आंदोलन

Dustbin Vastu Tips: घरात कचऱ्याचा डबा कोणत्या दिशेला ठेवावा? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, कर्मचाऱ्यांच्या पगारात १५,४०० रुपयांची वाढ, थकबाकी किती मिळेल?

SCROLL FOR NEXT