Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: अर्थसंकल्पानंतर मुंबई पुण्यासह तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचा भाव किती? जाणून घ्या

Petrol Diesel Rate 24th July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Siddhi Hande

राज्यात काल देशाचे अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काय घोषणा करण्यात येणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्यासाठी घोषणा होईल,अशी आशा सर्वसामान्य नागरिकांना होती. परंतु पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल डिझेलचे दर रोज अपडेट होत असतात. मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहे. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. चला तर मग जाणून घेऊया पेट्रोल डिझेलचे भाव

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहेत. मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ८९.९७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.चेन्नईत पेट्रोलचे दर १००.७८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३६ रुपये आहे.कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही.पुण्यात पेट्रोल १०४.०८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९०.६१ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.६४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.१६ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.१९ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.९६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५२ रुपये आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९१.०२ रुपयांवर विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: बात निकली है, तो बहोत दूर तक जाएगी; छगन भुजबळ यांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

SCROLL FOR NEXT