Budget 2024
Budget 2024 Google
बिझनेस

Income Tax: इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना लागणार लॉटरी; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Siddhi Hande

केंद्र सरकार जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन याबाबत बैठका घेतल आहेत.

अर्थ मंत्रालय अर्थसंकल्पात आयकरबाबत मोठा निर्णय घेणार आहे. मध्यमवर्गीय लोकांना दिलासा आयकर सवलतीबाबत गांभीर्याने विचार करत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना आयकर सूट मिळण्याची अपेक्षा आहे.

नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पात आयकर सूट दिली जाऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार नवीन कर प्रणालीमध्ये बदल करु शकते. १५ ते १७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी आयकर दर कमी करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकतो.

मागील टर्ममध्ये सरकारने नवीन कर प्रणाली सुरु केली होती. यामध्ये ७ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना आयकर कर भरावा लागत नाही. त्यानंतर आता १५-१७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांना कमी कराची तरतूद केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मागील अर्थसंकल्पात ७ लाख उत्पन्न असणाऱ्या लोकांना आयकर सूट दिली होती. त्याआधीच्या जुन्या करप्रणालीनुसार ५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर नव्हता. तसेच या दोघांवर ५० हजार रुपयांची स्टँडर्ड डिडक्शन लागू होते. म्हणजेच ७.५० लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर द्यावा लागत नाही. त्यानंतर आता १५ ते १७ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या लोकांचा आयकर कर कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : मुंबईतल्या मुसळधार पावसाचा आमदारांनाही फटका

Amravati News: संतापजनक! अमरावतीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, ४ आरोपींना अटक

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची दमदार बँटिंग; अनेक ठिकाणी साचले पाणी; पाहा PHOTO

Sambhajinagar News : मोठी बातमी! शिवसेना गटातील आमदाराच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक; राजकीय वर्तुळात खळबळ

Latur Accident News: हृदयद्रावक घटना! भरधाव कारने दुचाकीला उडवले, पतीचा जागीच मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT