Railway  Saam Tv
बिझनेस

Railway Ticket: ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास स्वस्त होणार; रेल्वे तिकीटात ५० टक्के कपात?

Railway Ticket For Senior Citizen: ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वेच्या तिकीटात ५० टक्के सूट मिळू शकते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा केली जाऊ शकते.

Siddhi Hande

नवीन वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडून सर्वसामान्य नागरिकांना अनेक अपेक्षा आहेत. २०२५ च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास तरतूद करण्याची शक्यता आहे. कोविडच्या आधी भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना ट्रेन तिकीटावर ४० ते ५० टक्के सूट दिली होती. ६० पेक्षा जास्त वयोगटातील पुरुषांना ४० टक्के सूट मिळते तर ५८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील महिलांना तिकीटावर ५० टक्के सूट मिळत होती. (Railway Ticket Price)

भारतीय रेल्वेच्या मेल, एक्सप्रेस, राजधानी, दुरांतो या ट्रेनवर ही सुविधा देण्यात आली होती. परंतु कोविडच्या काळात ही सुविधा बंद करण्यात आली होती. आतापर्यंतदेखील ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

कोविडमुळे ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनच्या तिकीटात ५० टक्के सूट देण्यात आली होती. आता पुन्हा ही सुविधा सुरु केली जाऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणण्यांनुसार, सेवानिवृत्तीनंतर त्यांच्याकडे उत्पन्नाचा काहीच पर्याय नसतो. त्यामुळे त्यांना रेल्वे तिकीटावर मिळणारी सूट दिलासादायक वाटते. त्यामुळेच आता ही सुविधा पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

२०२० मध्ये ही सुविधा बंद झाली होती. पु्न्हा ज्येष्ठ नागरिकांना ट्रेनच्या तिकीटात ५० टक्के सूट देण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात याबाबत मोठी निर्णय होण्याची शक्यता आहे. (Railway Ticket price For Senior Citizen)

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारामन १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे तिसरे अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षा आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंत प्रवास जलद होणार; मेट्रो ८ च्या कामाला वेग, गोल्डन मार्गावर किती स्टेशन असणार?

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी

Health warning signs: किडनी आणि लिव्हर खराब झाल्यानंतर शरीरात दिसतात हे बदल; डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती

Pune Summer Tourism: सहलीला जायाचा...! उकाड्यापासून सुटका हवीये? पुण्याजवळची ही 8 थंडगार ठिकाणे पाहाच

Maharashtra Politics: महिला आरक्षण विधेयकाआडून देश तोडण्याचा डाव, उद्धव ठाकरे यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT