बिझनेस

Recharge Update: लाखो यूजर्सना मोठा धक्का! 'या' कंपनीने एकाच वेळी अनेक प्लॅनची वैधता केली कमी

Mobile RechargeUpdate: Recharge India: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल किफायतशीर रिचार्जसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, लाखो ग्राहकांना आता मोठा धक्का बसला असून कंपनीने प्लॅन महाग केले आहेत.

Dhanshri Shintre

अनेक प्रीपेड प्लॅनची वैधता कमी

बीएसएनएलने मोठा बदल करत अनेक प्रीपेड प्लॅनची वैधता कमी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता रिचार्ज वारंवार करावा लागणार आहे. स्वस्त प्लॅनसाठी ओळखल्या जाणाऱ्या या सरकारी कंपनीच्या निर्णयामुळे यूजर्समध्ये नाराजी वाढली आहे. कोणत्या प्लॅनवर परिणाम झाला आहे याची माहिती पुढे जाणून घ्या.

१९७ रुपयांचा पॅक

बीएसएनएलने आपल्या प्लॅनमध्ये बदल करून १९७ रुपयांच्या पॅकमध्ये दिली जाणारी वैधता कमी केली आहे. आधी या प्लॅनची वैधता ५४ दिवस होती. पण आता ग्राहकांना केवळ ४८ दिवसच मिळतील. या प्लॅनमध्ये ५ तास कॉलिंग, ४ जीबी डेटा आणि १०० एसएमएसचा लाभ घेता येईल.

३१९ रुपयांचा पॅक

बीएसएनएलने ३१९ रुपयांच्या प्लॅनमध्येही सुधारणा केली असून आता या प्लॅनची वैधता ६५ दिवसांवरून कमी करून ६० दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. या पॅकमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसोबत एकूण १० जीबी डेटा आणि ३०० मोफत एसएमएसचा लाभ दिला जातो.

४३९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलने ४३९ रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल केले असून या पॅकची वैधता आता ९० दिवसांवरून घटवून ८० दिवस करण्यात आली आहे. या रिचार्जसोबत ग्राहकांना अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि ३०० मोफत एसएमएसचा लाभ मिळत राहणार आहे.

५९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलने ५९९ रुपयांच्या लोकप्रिय प्लॅनची वैधता कमी केली आहे. पूर्वी ८४ दिवस सेवा मिळणाऱ्या या प्लॅनमध्ये आता ग्राहकांना केवळ ७० दिवसांपर्यंतच सुविधा मिळणार आहेत. या पॅकमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ कायम राहणार आहे.

८९७ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या ८९७ रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल करण्यात आला आहे. आता या रिचार्जची वैधता १८० दिवसांवरून कमी करून १६५ दिवस करण्यात आली आहे. मात्र, सुविधांमध्ये कोणताही बदल नाही. योजनेत ग्राहकांना अमर्यादित कॉलिंग, एकूण २४ जीबी डेटा आणि ठराविक मोफत एसएमएस मिळत राहणार आहेत.

९९७ रुपयांचा प्रीपेड प्लॅन

बीएसएनएलने ९९७ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनची वैधता कमी केली आहे. आधी या प्लॅनमध्ये १६० दिवसांची सेवा मिळत होती. परंतु आता ग्राहकांना फक्त १५० दिवसांचाच फायदा मिळेल. या पॅकमध्ये दररोज २ जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसची सुविधा कायम राहणार आहे.

१४९९ रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या १४९९ रुपयांच्या प्लॅनमध्येही बदल करण्यात आला आहे. आधी या प्लॅनची वैधता ३३६ दिवस होती. मात्र आता ती कमी करून ३०० दिवसांपर्यंत करण्यात आली आहे. या दीर्घकालीन प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा कायम उपलब्ध राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Bodies Election: नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरताय? अर्ज कसा कराल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Chapati Tips: चपात्या कडक होतात, फुगतच नाहीत? नेमकी कुठे चूक होते? कणिक मळताना घाला '१' पदार्थ

Maharashtra Live News Update: केंद्रीय पथकाकडून धाराशिवमधील पूरग्रस्त भागाची पाहणी; नागरिकांशी साधला संवाद

BSA Thunderbolt ADV: चिखल असो कि खडकाळ रस्ता, तरीही सुसाट धावेल 'थंडरबोल्ट' अ‍ॅडव्हेंचर बाईक; 2026 मध्ये भारतात लाँच

लवकरच पूर्ण होणार रिंगरोड, कल्याण-डोंबिवलीकरांची वाहतूक कोंडीतून कधी सुटका होणार? आयुक्तांनी सांगितली तारीख

SCROLL FOR NEXT