बिझनेस

Budget Streaming: BSNL ने लाँच केला सर्वात स्वस्त प्लॅन, फक्त ₹३० मध्ये मिळवा OTT अ‍ॅक्सेस अन् मनोरंजनाची सुविधा

BSNL Cinema Plus: बीएसएनएलने भारतात ४जी सेवा सुरू केली असून, ओटीटी क्षेत्रात प्रवेश केला आहे. नवीन ‘सिनेमा प्लस’ योजनेत फक्त ₹३० मध्ये डी.डी. चॅनेल आणि ओटीटी सुविधा मिळतात. याबद्दल जाणून घ्या कसे सक्रिय करावे.

Dhanshri Shintre

BSNL ने नुकताच "Cinema Plus" हा खास OTT बंडल प्लॅन लाँच केला आहे. यूजर्सना SonyLIV, Zee5 आणि JioCinemaसारखी अनेक ओटीटी अॅप्स केवळ ₹३० पासून पाहता येणार आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनीचा हा नविन प्लॅन कमी किमतीत विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश देतो. डिजिटल मनोरंजनासाठी हा एक आकर्षक आणि किफायतशीर पर्याय ठरू शकतो.

बीएसएनएलने आपल्या यप्पटीव्ही स्कोप सेवेला नवीन नाव देत आता “सिनेमा प्लस” म्हणून सादर केले आहे. ही ओटीटी बंडल सेवा फक्त बीएसएनएल एफटीटीएच (फायबर-टू-द-होम) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. बीएसएनएल फायबर इंटरनेट वापरणारे यूजर्सच या प्लॅटफॉर्मवरील विविध ओटीटी कंटेंटचा लाभ घेऊ शकतील. ज्यामुळे त्यांना अधिक मनोरंजक आणि किफायतशीर डिजिटल अनुभव मिळेल.

किती आणि कोणत्या योजना उपलब्ध

बीएसएनएल सिनेमा प्लसमध्ये यूजर्ससाठी विविध सबस्क्रिप्शन प्लॅन उपलब्ध आहेत. सर्वात कमी दराचा प्लॅन फक्त ₹३० प्रति महिना असून, यात डीडी चॅनेल्स आणि वेव्हज ओटीटीचा समावेश आहे. याशिवाय ₹४९, ₹१९९ आणि ₹२४९ चे इतर पर्यायी प्लॅनही दिले गेले आहेत. जे अधिक ओटीटी सेवांचा प्रवेश देतात.

सोनी लिव्ह आणि जिओ हॉटस्टार १९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये

₹२४९ च्या बीएसएनएल सिनेमा प्लस प्लॅनमध्ये Zee5 आणि Lionsgate Play सारखे प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. हे सर्व प्लॅन यूजर्सच्या विविध मनोरंजन गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.

बीएसएनएल सिनेमा प्लस कसे सक्रिय करायचे?

बीएसएनएल सिनेमा प्लस सेवा वापरण्यासाठी ग्राहकांकडे बीएसएनएल एफटीटीएच कनेक्शन असणे आवश्यक आहे. यूजर्स आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरून इच्छित प्लॅन निवडू शकतात. जो त्यांच्या फायबर खात्याशी जोडला जातो. त्यानंतर बीएसएनएल सिनेमा प्लस पोर्टलवर लॉग इन करून ओटीटी कंटेंट सहजपणे पाहता येतो. ही सेवा कमी किमतीत उत्कृष्ट ओटीटी अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maheshwari Saree Designs: साध्या पण दिसायला भारी महेश्वरी साड्यांची भलतीच क्रेझ, या आहेत 5 डिझाईन्स

Two New Airlines:नव्या दोन एअरलाईन्सची विमानं आकाशात भरणार उड्डाण; केंद्र सरकारची मंजुरी

'हिंदूंनो 4 मुलं जन्माला घाला'; राणांचा सल्ला, विरोधकांचा हल्ला, VIDEO

Maharashtra Politics : भाजपला रोखण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र? सुप्रिया सुळेंनी दिले सूचक संकेत

BMC Election : शिंदेंना हव्यात तिजोरीच्या चाव्या; BMCसाठी भाजप-शिंदेसेनेमधला पेच कायम, VIDEO

SCROLL FOR NEXT