BSNL surprises users with ₹1 plan: Unlimited calling and 2GB data per day for 30 days saam tv
बिझनेस

BSNLची खास ऑफर! 1 रुपयात काय येतं? 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग

BSNL Launches Independence Day Offer : तुम्हाला तुमच्या कामसाठी इंटरनेट हवं? तासन् तास मित्र-मैत्रिणींसह गप्पा करायच्या आहेत. तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. BSNL ने स्वातंत्र्य दिनाच्या ऑफरअंतर्गत १ रुपयांचा प्लॅन लाँन्च केलाय. ही ऑफर काय आहे हे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

  • बीएसएनएलने स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १ रुपयात नवीन प्लॅन जाहीर केला आहे.

  • या प्लॅनमध्ये ३० दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग दिलं जातं.

  • खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ही एक जबरदस्त ऑफर मानली जाते.

  • ग्राहकांसाठी ही ऑफर अत्यंत किफायतशीर आणि उपयुक्त आहे.

टेलिकॉम कंपन्यां १५ ऑगस्टनिमित्त खास ऑफर्स लॉन्च करत असतात. BSNL ने आपल्या युजर्ससाठी अशीच एक ऑफर आणली आहे. तेही फक्त आणि फक्त १ रुपयांमध्ये. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज असलेला सरकारी टेलिकॉम BSNL कंपनीने १ रुपयांचा शानदार प्लॅन लाँन्च केलाय.या प्लॅनमध्ये युजर्संना ३० दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज २ GB डेटा सारखे फीचर्स मिळतील.

युजर्सला आकर्षित करण्याच्या उद्देशाने BSNL ने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या नव्या प्लॅनची घोषणा केलीय. BSNL ने आपल्या अधिकृत X हँडलवर 'फ्रीडम ऑफर' लाँन्च केलीय. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. केवळ १ रुपयांच्या रिचार्जवर युजर्संना दररोज २ GB हाय स्पीड डेटा, संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंग (नॅशनल रोमिंगसह) आणि १०० फ्री SMS मिळतील. BSNL ची ही लिमिटेड टाइम ऑफर देशातील सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये वैध असणार आहे.

ही ऑफर १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट पर्यंत चालेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजर्संना केवळ १ रुपयांत BSNL चे नवे सिमकार्ड खरेदी करावे लागणार आहे. पण लक्षात ठेवा, ही ऑफर केवळ नवीन BSNL युजर्ससाठी आहे. त्याबाबत कंपनीने सोशल मीडियावर माहिती दिलीय. TRAI च्या ताज्या रिपोर्टनुसार, गेल्या काही महिन्यांत BSNL आणि व्हीआयच्या लाखो युजर्सने नेटवर्क बदलले आहे.

युजर्सच्या संख्येत सातत्याने घसरण होत असल्यानं सरकारी टेलिकॉम कंपनीने युझर्सला आकर्षित करण्यासाठी ही खास ऑफर आणलीय. दरम्यान BSNL चे सरासरी रेव्हेन्यू पर युजर (ARPU) वाढविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आता मासिक आढावा बैठका घेण्यात येणार आहेत. BSNL ला आपल्या ARPU मध्ये ५० टक्के वाढ करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

बीएसएनएलने कोणता नवीन प्लॅन लाँच केलाय?

बीएसएनएलने १५ ऑगस्टच्या निमित्ताने फक्त १ रुपयात नवीन प्लॅन लाँन्च केलाय.

या प्लॅनमध्ये काय-काय सुविधा मिळतात?

३० दिवसांची वैधता, दररोज २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते.

बीएसएनएलचा हा प्लॅन कशासाठी खास मानला जातो?

कारण फक्त १ रुपयात इतक्या सुविधा मिळणं ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट आहे.

बीएसएनएलचा हा प्लॅन खासगी कंपन्यांना टक्कर देतो का?

Jio, Airtel यांसारख्या खासगी कंपन्यांना मोठी टक्कर देणारा हा अत्यंत स्वस्त प्लॅन आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Sleep Time: रात्री झोपण्याची योग्य वेळ कोणती

Pune Crime: दुचाकीला कट का मारला? रागाच्या भरात हवेत गोळीबार,अवघ्या 24 तासात पुण्यात 2 गोळीबाराच्या घटना

Male hygiene and fertility : पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट घटण्याचे कारण काय? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडच्या वकिलांची हायकोर्टात धाव,रीट पिटीशन दाखल

Reels Addiction: तुम्हालाही सतत रील्स पाहायची सवय आहे? सोडवण्यासाठी 'या' टिप्स वापरा

SCROLL FOR NEXT