Share Market Opening Update: bse sensex all-time high 70000 mark on Tuesday 12th December after nse nifty 21000 cross first time  Saam Tv
बिझनेस

Share Market Opening: शेअर बाजाराला 'अच्छे दिन'; निफ्टीची २०,००० पल्याड झेप, Sensex सलग दुसऱ्या दिवशी 'ऑल टाइम हाय'

Share Market Opening (12 December 2023) Update | BSE Sensex Cross 70000 Points : सकाळ होताच सेन्सेक्स ६९,९२५. ६३ अंकांवर खुला झाला. तर काही वेळातच ७०,०५७.८३ अंकांवर पोहोचला.

कोमल दामुद्रे

BSE Sensex Crosses 70000 Ponits:

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सध्या अच्छे दिन सुरु आहेत. कारण शेअर बाजार सध्या रेकॉर्डब्रेक तेजीत आहे. सोमवारी सेन्सेक्सने विक्रमी झेप घेतली होती. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने ७० हजाराहून अधिक अंकांची पातळी ओलांडली होती.

तर मंगळवारी देखील सेन्सेक्सने ७० हजारचा टप्पा पार केला. आज सेन्सेक्स ६९,९२५. ६३ अंकांवर खुला झाला. तर काही वेळातच ७०,०५७.८३ अंकांवर पोहोचला. आज प्रमुख बाजार (Market) निर्देशकांनी नवीन सर्वकालीन उच्चांकाचा टप्पा ओलांडला. निफ्टीने प्रथमच २१,०३१ ची पातळी गाठली. सेन्सेक्सही ७० हजारांच्यावर पोहोचला.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर बाजाराच्या (Share Market) तेजीत मेटल, फार्मा आणि पीएसयू बँकिंग शेअर्सनी मोठा हातभार लावला आहे. तसेच विमा (Insurance) क्षेत्रातही बऱ्यापैकी वाढ नोंदवण्यात आली. SBI Life आणि HDFC Life निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले आहेत.

1. मिडकॅपमध्येही भरारी

बँक निफ्टी आज सुमारे ११० अंकांनी वधारत असताना सर्व मिडकॅप शेअर्स १७५.९० अंकांनी किंवा ०.३९ टक्क्यांनी वाढून ४४,९०५ वर व्यवहार करताना दिसत आहेत. मिडकॅप शेअर्सनी आतापर्यंतची सर्वात मोठी उच्चांकाची पातळी गाठली. निफ्टीमध्ये आयटी निर्देशांक घसरला असून सध्या तो लाल रंगात व्यवहार करताना दिसून आला.

मंगळवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात, इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा IREDA चे शेअर्स १४ टक्क्यांनी वाढले होते. यामध्ये ९७ रुपयांची पातळी ओलांडली. हजूर मल्टी प्रोजेक्ट लिमिटेडचा शेअर पाच टक्क्यांनी, आशानिषा इंडस्ट्रीजचा शेअर ४.५ टक्के आणि बीसीएल इंडस्ट्रीजचा शेअर ३.४ टक्क्यांनी वाढला आहे.

निफ्टी मिडकॅपमध्ये १०० बीएसई स्मॉल कॅप, निफ्टी आयटी आणि निफ्टी बँक निर्देशांक वाढ नोंदवली आहे. सुरुवातीला या शेअर्समध्ये UPL, UltraTech Cement, Adani Enterprises आणि LTI Mindtree सारख्या शेअर्सचा समावेश होता, तर घसरणीत BPCL सारख्या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेसोबत जाण्यास हरकत काय? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचे मोठे विधान, राज्याच्या राजकारणात भूकंप

Maharashtra Live News Update: उमरगा तालुक्यातील कदेर परिसरात गारांचा पाऊस, शेती पिकांचे नुकसान

Shocking: क्षणात सर्वकाही संपलं! पिस्तूल छातीवर लावलं अन् ट्रिगर ओढला, रीलच्या नादात तरुणाने गमावला जीव; थरारक VIDEO

Summer Vacation In Satara : मनाला भुरळ घालणारे साताऱ्यातील हिल स्टेशन, कडाक्याच्या उन्हात 'येथे' मिळेल थंडगार हवा

नवी मुंबईत अपघाताचा थरार! धावत्या ट्रेनखाली महिलेने झोकून दिलं; शरीराचे झाले 2 तुकडे

SCROLL FOR NEXT