Brics Summit 2024:  Saamtv
बिझनेस

Brics Summit 2024: भारत रशिया आणि चीनचे एकच चलन येणार, डॉलरला टक्कर देणार; काय आहे रणनिती?

Brics Summit 2024: भारत या देशांशी डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करू शकणार आहे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

Gangappa Pujari

Brics Summit 2024: रशियातील कझान येथे सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेत यावेळी ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’ या मुद्द्याला विशेष महत्त्व देण्यात आले. जगातील तीन मोठ्या आर्थिक शक्ती एका व्यासपीठावर एकत्र आल्यावर सर्व पाश्चिमात्य देशांचे डोळे याकडे लागले होते. परिषदेत भारत, रशिया आणि चीननेही अमेरिकेला व्यापारावर थेट आव्हान देण्याचे संकेत दिले आहेत. ब्रिक्समध्ये समाविष्ट असलेल्या देशांनी आता परस्पर व्यापार डॉलरऐवजी स्थानिक चलनात करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ भारत या देशांशी डॉलरऐवजी रुपयात व्यवहार करू शकणार आहे. या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह ब्रिक्स देशांचे प्रमुख नेते उपस्थित होते.

जगातील मोठ्या अर्थव्यवस्था एकाच मंचावर

ब्रिक्स देशांनी बुधवारी व्यापार वाढविण्यास आणि स्थानिक चलनांमध्ये आर्थिक देवाण- घेवाणाची व्यवस्था निर्माण करण्याचे मान्य केले. स्वतंत्रपणे कार्यरत क्रॉस-बॉर्डर सेटलमेंट आणि डिपॉझिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि ब्रिक्स पुनर्विमा कंपनीच्या व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यावरही या बैठकीत सहमती झाली. सदस्य देशांच्या नेत्यांनी 21 व्या शतकात नवीन प्रकारची बहुपक्षीय विकास बँक (MDB) म्हणून नवीन विकास बँक विकसित करण्यास सहमती दर्शविली आणि BRICS-नेतृत्वाखालील बँकेच्या सदस्यत्वाचा विस्तार करण्यास समर्थन दिले.

ब्रिक्स देशांच्या निवेदनात काय म्हटले?

16व्या ब्रिक्स परिषदेनंतर जारी करण्यात आलेल्या घोषणेमध्ये सदस्य देश स्थिरता राखण्यासाठी आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात संयुक्त उपक्रमांची शक्यता तपासतील. BRICS नेत्यांनी 21 व्या शतकातील मानवी जीवनाच्या सर्व पैलूंच्या वेगवान डिजिटलायझेशन प्रक्रियेबद्दल चिंता व्यक्त केली आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी BRICS मध्ये प्रतिबद्धता अधिक तीव्र करण्याची गरज लक्षात घेतल्याचे म्हटले आहे.

नवीन बँकिग नेटवर्क तयार होणार

BRICS नेत्यांनी समूहामध्ये 'कॉरेस्पॉन्डंट बँकिंग नेटवर्क' मजबूत करण्यासाठी आणि BRICS क्रॉस बॉर्डर पेमेंट इनिशिएटिव्ह (BCBPI) च्या अनुषंगाने स्थानिक चलनांमध्ये सेटलमेंट सक्षम करण्याचे आवाहन केले. जे ऐच्छिक आणि बंधनकारक नाही. ब्रिक्समध्ये यापूर्वी ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश होता. त्यात आता पाच अतिरिक्त सदस्य इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीचाही समावेश करण्यात आला आहे.

नेत्यांनी ब्रिक्स देशांचे अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांना स्थानिक चलने, पेमेंट उत्पादने आणि प्लॅटफॉर्मच्या मुद्द्यावर चर्चा सुरू ठेवण्याचे काम दिले. आपल्या सदस्य देशांच्या पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) ची भूमिका ओळखून, BRICS नेत्यांनी 2022-2026 साठी NDB ची समान रणनीती पूर्ण करण्यासाठी कॉर्पोरेट प्रशासन आणि कार्यात्मक परिणामकारकता मजबूत करण्यास सहमती दर्शविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahisar Exit Poll : दहिसर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? घोसळकर भाजपला धक्का देणार का?

President's Rule : 26 तारखेला राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल का? अनंत कळसेंनी काय सांगितलं, पाहा VIDEO!

Kankavli Exit Poll: राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार का? कणकवलीचा एक्झिट पोल काय सांगतो?

Maharashtra Exit Poll : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभेवर जाणार का? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतो?

Saam Exit Poll : ठाकरे गटाची तोफ धडाडणार? गुहागर कोण जिंकणार? एक्झिट पोलचा अंदाज आला

SCROLL FOR NEXT