आंतरराष्ट्रीय बाजारात रोज कच्च्या तेलाचे नवीन भाव जाहीर होत असतात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. कच्च्या तेलाचे दर सध्या घटले आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचेभाव कधी कमी होणार याची वाट सर्वसामान्य लोक पाहत आहेत. कच्च्या तेलाचे भाव हे असेच कमी राहिल्यास देशातील पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल डिझेलचे दर कमी करु शकतात.
तज्ज्ञांच्या मते, राज्यातील विधानसभा निवडणूकीपूर्वी पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील. प्रति लिटर २-२ रुपयांनी पेट्रोल डिझेलच्या भावात घसरण होईल, असं सांगण्यात येत आहे. कच्च्या तेलाचे दर घटले आहेत. परंतु आठवड्याभराच्या आकडेवारीवर निर्णय घेता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. जर हे दर पुढील काही दिवस कमी राहिले तर पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा विचार केला जाऊ शकतो.
ब्रेंट क्रूड ऑइल किंमत
१ एप्रिल २०२४- ९०.६० डॉलर प्रति बॅरल
४ जून २०२४-७७.५० डॉलर प्रति बॅरल
४ जुलै २०२४- ८७.४० डॉलर प्रति बॅरल
४ सप्टेंबर- ७२.९१ डॉलर प्रति बॅरल
११ सप्टेंबर २०२४-७०.१३ डॉलर प्रति बॅरल
गेल्या आर्थिक वर्षात ८२,५०० कोटी रुपये नफा हा तेल कंपन्यानी कमावला आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमती गेल्या अनेक महिन्यापासून घसरत आहे.
मंगळवारी ब्रेंट क्रूड ऑइल ७९ डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी होते. २०२१ नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती एवढ्या घरसल्या आहेत. आज ब्रेंट क्रूड ऑइल ७१.७१ डॉलरवर विकले जाते.WTI क्रूड ऑइल ६८.३५ डॉलर प्रति बॅरलवर विकले जात आहे.
मुंबईत आज पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.पुण्यात पेट्रोल १०४.०६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५९ रुपये आहे. नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.२० रुपये आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.१४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.७० रुपये आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.