Bank Of Baroda Recruitment Saam Tv
बिझनेस

BOB Recruitment: कोणतीही परीक्षा नाही, थेट बँक ऑफ बडोदात नोकरी; भरघोस पगार मिळणार; अर्ज कधीपर्यंत करता येणार? वाचा

Bank Of Baroda Sportsperson Recruitment 2026: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. स्पोर्ट्सपर्सन पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी

कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

पगार ६४४८० रुपयांपर्यंत मिळणार

चांगल्या सरकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही. बँकेत स्पोर्ट्सपर्सन पदासाठी भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये क्रिकेट,कबड्डी, टेबल टेनिस या खेळांमध्ये स्पोर्ट्सपर्सन पदासाठी भरती निघाली आहे. या नोकरीसाठी bankofbaroda.bank.in वेबसाइटवर अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. स्पोर्ट्सकोटाअंतर्गत भरती केली जाणार आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये भरती करण्याची सुरुवाती २२ एप्रिलपासून झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मे २०२६ आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट पदासाठी ही भरती केली जाणार आहे. विविध शहरांमध्ये ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदामधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केलेले असावे. कामाचा कोणताही अनुभव नसेल तरी चालणार आहे. याचसोबत राज्य, केंद्र शासित, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळात मेडल जिंकलेले असावे. किंव खेलो युथ इंडियामध्ये मेडल मिळवलेले असावे.

या नोकरीसाठी २० ते २८ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग, स्क्रिनिंग, फील्ड ट्रायल बेस्डवर आधारित होणार आहे. या नोकरीसाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २४०५० ते ६४४८० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT