BMW CE 04 electric scooter  Saam Tv
बिझनेस

BMW ची नवीन EV Scooter CE 04 'या' दिवशी होणार लॉन्च, याच्या किंमतीत खरेदी करता येईल दोन कार

BMW CE 04: BMW CE 04 इलेक्ट्रिक स्कूटर पुढील महिन्यात लॉन्च होणार आहे. जाणून घ्या याच्या फीचर्स आणि किंमतबद्दल सविस्तर माहिती.

Satish Kengar

आपल्या कार्ससाठी प्रसिद्ध असलेली BMW लवकरच एक जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर CE 04 लॉन्च करणार आहे. या हाय क्लास टू व्हीलरमध्ये सर्व अत्याधुनिक फीचर्स आणि सेफ्टी फीचर्स असतील. ही स्कूटर कंपनी 24 जुलै रोजी लॉन्च करणार आहे. सध्या कंपनीने याची किंमत जाहीर केलेली नाही. मात्र या स्कूटरची किंमत 9 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

किती देणार रेंज?

ही एक हाय रेंज स्कूटर असेल, जी एका चार्जवर 130 किमीची रेंज देईल, असं बोललं जात आहे. खराब रस्त्यांवर आरामदायी प्रवास करण्यासाठी स्कूटरला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन दिले जाईल. सुरक्षिततेसाठी ही स्कूटर अलॉय व्हील आणि डिस्क ब्रेकसह उपलब्ध असेल.

BMW CE 04 ला 8.9kWh ची पॉवरफुल बॅटरी मिळेल. ही नेक्स्ट जनरेशन हायस्पीड स्कूटर आहे, जी फक्त 2.6 सेकंदात 0 ते 50 किमी प्रतितास वेग गाठेल. या पॉवरफुल स्कूटरला 120kph चा टॉप स्पीड मिळेल. ही स्कूटर 4:20 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. यात फास्ट चार्जिंगचा पर्याय देखील असेल, ज्यामुळे ही फक्त 1:40 तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होईल.

BMW CE 04 ची सीटची उंची 780 mm आहे. ज्यामुळे कमी उंचीचे लोकही ती सहज चालवू शकतात. स्कूटरमध्ये 15 इंच व्हील्सचा आकार आहे, जो याला एक स्टाइलिश लूक देतो. स्कूटरचे एकूण वजन 179 किलो आहे. ज्यामुळे रस्त्यावर नियंत्रण करणे सोपे होते. स्कूटरमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल असेल, ज्यामुळे ती रस्त्यावर सुरळीत चालेल.

BMW CE 04 ला अँटी ब्रेकिंग सिस्टम मिळेल, ज्यामुळे याला अतिरिक्त सुरक्षा मिळेल. स्कूटरमध्ये टीएफटी डिस्प्ले ग्राहकांना मिळेल. ज्यामुळे याचा लूक आणखी डॅशिंग वाटतो. यात ब्लूटूथ, नेव्हिगेशन, एलईडी हेडलाइट आणि स्प्लिट सीट असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shilpa Shetty Photos: बोल्ड अन् ब्युटिफूल शिल्पा शेट्टीचा नवा लूक, ब्लॅक आऊटफिटमध्ये घातलाय धुमाकूळ

कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या युतीची खिचडी शिजली; कट्टर विरोधक आले एकत्र, कागलचं राजकारण 24 तासात फिरलं

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणांना महायुती सरकारचा मोठा दिलासा; e-KYC साठी मुदतवाढ, शेवटची तारीख काय?

Actress Search on Google: गुगलवर सर्वात जास्त कोणत्या अभिनेत्रींना सर्च केलं जात आणि का? जाणून घ्या खास कारण

Sheikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशी, बांग्लादेशमधील हिंसाचाराचा ठपका

SCROLL FOR NEXT