Skoda ने आपल्या Slavia आणि Kushaq च्या किंमतीत केली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत

Skoda Slavia Price Reduce: SKODA ने आपल्या SLAVIA आणि KUSHAQ कार्सच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
Skoda ने आपल्या SLAVIA आणि KUSHAQ च्या किंमतीत केली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत
Skoda Slavia Saam Tv
Published On

स्कोडाच्या कार्स जबरदस्त बिल्ड क्वालिटी आणि स्टायलिश लूकसाठी ओळखल्या जातात. आता कंपनीने आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. स्कोडाने त्यांच्या दोन सर्वाधिक विक्री होणाऱ्या Skoda Slavia आणि SUV Kushaq या कार्सवर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे. किमतीत कपात केल्यानंतर आता Kushaq 10.89 लाख रुपये एक्स-शोरूम आणि Slavia 10.69 लाख एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत ऑफर केली जात आहे.

Skoda Slavia ही कंपनीची फॅमिली सेडान कार आहे, ज्यामध्ये लांबच्या प्रवासासाठी 521 लीटरची मोठी बूट स्पेस मिळते. या कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. या कारमध्ये हिल होल्ड असिस्ट फीचर्स देण्यात आलं आहे, जे पर्वत आणि उतार असलेल्या रस्त्यावर कारची चारही चाके नियंत्रित करण्यास मदत करते.

Skoda ने आपल्या SLAVIA आणि KUSHAQ च्या किंमतीत केली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत
Cars Under 5 Lakh: कार घेण्याचा विचार करताय? तर 'या' आहेत ५ लाखांपेक्षा कमी किंमतीतील बेस्ट कार

कंपनीचा दावा आहे की, ही कार रस्त्यावर जास्तीत जास्त 19.47 kmpl चा मायलेज देऊ शकते. या हाय क्लास लक्झरी कारमध्ये मागील पार्किंग सेन्सर, 10 इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Skoda Slavia फीचर्स

कारमध्ये सिंगल पेन सनरूफ देण्यात आलं आहे. सुरक्षेसाठी कारमध्ये सहा एअरबॅग्ज आणि अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिम आहे. यात पॉवर ड्रायव्हर सीट उपलब्ध आहे. कारमध्ये 1498 cc पेट्रोल इंजिन आहे, जे हाय पिकअपसाठी 150 पीएस पॉवर जनरेट करते. हाय स्पीडसाठी 6 आणि 7 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

Skoda ने आपल्या SLAVIA आणि KUSHAQ च्या किंमतीत केली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत
१२ वर्षानंतर मार्केट जाम करायला Renault Duster सज्ज; काय असणार खास?

Skoda Kushaq

अलीकडेच कंपनीने आपल्या कारचे नवीन Onyx मॉडेल लॉन्च केले आहे. कारमध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आहे, हे 3 सिलेंडर इंजिन आहे. कारमध्ये टर्बो इंजिनचा पर्यायही उपलब्ध आहे. या कारमध्ये लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी 385 लीटरच्या बूट स्पेस देण्यात आला आहे. कारमध्ये क्रूझ कंट्रोल आणि स्टायलिश 2 स्पोक स्टिअरिंग व्हील देण्यात आले आहे.

Skoda Kushaq फीचर्स

ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये कारला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे. या 5 सीटर कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मागील सीटवर एसी व्हेंट आणि चाइल्ड सीट अँकरेजचे फीचर्स यात ग्राहकांना मिळेल. कारमध्ये 115 PS पॉवर आणि 178 Nm टॉर्क आहे. यात 6 स्पीड गिअरबॉक्स आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com