Blue Colour Aadhar Card Saam Tv
बिझनेस

भारत सरकार बनवतंय Blue Aadhar Card; कोणासाठी असते निळे आधार कार्ड? जाणून घ्या

Blue Colour Aadhar Card: आधार कार्ड ही भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे ओळखपत्र आहे. भारतीय नागरिकांना प्रत्येक कामासाठी आधार कार्ड गरजेचे असते. भारत सरकार निळ्या रंगाचे आधार कार्डदेखील बनवत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डहे आवश्यक असते. पासपोर्ट पासून ते अगदी घर खरेदीपर्यंत आधार कार्ड उपयोगी असते. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्य्कीतकडे आधार कार्ड असते. आधार कार्डमध्ये दोन प्रकार आहेत. निळ्या रंगाचे आधार कार्ड आणि पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड.

आतापर्यंत तुम्हाला पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड माहित असेल. परंचु निळ्या रंगाचे आधार कार्डदेखील वापरले जाते. हे निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणासाठी वापरले जाते. याबाबत माहिती घेऊया.

निळ्या रंगाचे आधार कार्ड म्हणजे 'बाल आधार'. लहान मुलांसाठी हे आधार कार्ड बनवे जाते. ५ वर्षांपूर्वी कमी वयातील मुलांसाठी निळ्या रंगाचे आधार कार्ड तयार करण्यात येते. पाच वर्षानंतर हे आधार कार्ड अवैध ठरते. पाच वर्षानंतर तुम्हाला हे आधार कार्ज नॉर्मल आधार कार्डमध्ये बदलावे लागेल. निळ्या रंगाच्या आधार कार्डमध्ये १२ अंकी आधार नंबर असतो.

नियमित आधार कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेप्रमाणेच लहान मुलांचे आधार कार्ड बनले जाते. यासाठी ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, जन्मतारीख अशी कागदपत्रे द्यावी लागतील. या आधार कार्डमध्ये लहान मुलाची बायोमॅट्रिक माहिती नसते. सामान्य आधार कार्डमध्ये एखाद्या व्यक्तीची सर्व माहिती बायोमॅट्रिकद्वारे मिळते.

लहान मुले ५ वर्षाची झाल्यानंतर मुलाचे नवीन आधार कार्ड बनवावे लागेल. हे आधार कार्ड मुलाच्या १५ वर्षापर्यंत अवैध असेल. १५ वर्षानंतर तुमचे नवीन आधार कार्ड बायोमॅट्रिक असेल.

UIDAI नुसार, पालक निळ्या रंगाचे आधार कार्ज बनवण्यासाठी त्यांच्या मुलाचा शाळेचा आयडी वापरु शकतात. जन्माचा दाखला, हॉस्पिटलचे डिस्चार्ज स्लिप हे कागदपत्रेदेखील वापरु शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

SCROLL FOR NEXT