ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुम्ही भारतीय नागरीक आहात ही ओळख पटवून देण्यासीठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड.
पण तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या आधार कार्डाचं नेमकं काय होतं असा प्रत्याकाला प्रश्न पडतो.
तुमच्या मृत्यूनंतर आधार कार्ड लॉक केलं जातं. तर जाणून घ्या आधार कार्ड लॉक करण्याची योग्य पद्धत.
आधार कार्ड लॉक करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 'UIDAI' च्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन 'myaadhar' या ऑप्शनवर क्लिक करा.
त्यानंतर सर्व्हिसवर क्लिक करा आणि लॉक बायोमॅट्रिक पर्याय निवडा. मग तुमच्या स्क्रिनवर नवीन पेज ओपन होऊन त्यावर तुमचा आधार कार्ड नंबर टाका.
त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो ओटीपी भरल्यानंतर बायोमॅट्रिक डेटाला लॉक अनलॉक करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा
या सर्व प्रक्रिये नंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल. एकदा का आधार कार्ड लॉक झालं त्यानंतर ते कोणत्याही व्यक्तीला ओपन करता येत नाही.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.