Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला १० हजार रूपये, लाडकीसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Bihar Chief Minister Employement Scheme: बिहार सरकारने मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु केली आहे. बिहारमधील या योजनेत महिलांना पहिल्या हप्त्यात १०,००० रुपये मिळणार आहेत.

Siddhi Hande

बिहार सरकारने सुरु केली नवी योजना

महिलांसाठी महिला रोजगार योजना सुरु

या योजनेत पहिल्या हप्त्यात १०,००० रुपयांची मदत

केंद्र सरकारने नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या आहे. महिलांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, त्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकारनेही योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे.या योजनेत महिलांना आर्थिक मदत मिळते. दरम्यान,आता बिहार सरकारनेही महिलांसाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत महिलांना १० हजार रुपये दिले जाणार आहे. पहिल्या हप्त्यात महिलांना १० हजार रुपये दिले जाणार आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणूकांपूर्वी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. महिलांना सक्षम आणि स्वावलंबी होण्यासाठी महत्त्वाची पाऊले उचलण्यात आली आहेत. महिलांच्या हितासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री महिला रोजगार योजना मंजुर केली आहे.

योजना नक्की आहे तरी काय? (Bihar Chief Minister Employement Scheme)

मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेत आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला पहिल्या हप्त्यात १०,००० रुपये दिले जातात.

महिलांकडून अर्ज स्विकारण्याची प्रोसेस सुरु केली जाईल. ग्रामीण विकास विभागाकडून ही व्यवस्था केली जाईल.

महिलांच्या बँक खात्यात सप्टेंबर २०२५ पासून निधी जमा केला जाईल.

महिलांना २ लाखांपर्यंत मदत मिळेल

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेअंतर्गत सुरुवातीला १०,००० रुपयांचा निधी दिला जाईल. नंतर आर्थिक मदत दिली जाईल. महिलांना रोजगार सुरु केल्यानंतर सहा महिन्यांनी गरजेनुसार २ लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. गावांपासून शहरांपर्यंत महिलांना उत्पादनांच्या विक्रीसाठी हाट बाजार विकसित करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्‍यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा होणार? दिवाळीआधी सरकार घेणार मोठा निर्णय; वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीमध्येच संघर्ष

ICE Facial : बर्फाच्या पाण्याने फेशिअल करताय? 'हे' ६ फायदे जाणून घ्या

Abhijeet Dipke : 'माझ्या अटकेची तयारी सुरू'; मध्यरात्री पत्रकार परिषद घेऊन अभिजीत दिपकेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Rain Alert: पुणे, सोलापूरसह १० जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT