PM Kisan Yojana Saam Tv
बिझनेस

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २३ वा हप्ता हवाय? मग 'हे' काम लगेच करा

eKYC process PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेचा 23 वा हप्ता लवकरच जमा होणार असून, लाभार्थ्यांसाठी e-KYC आणि Farmer ID अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणार नाहीत.

Namdeo Kumbhar

PM Kisan installment date 2026 : केंद्र सरकार लवकरच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २३ वा हप्ता (PM Kisan Yojana 23rd Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. या योजनेद्वारे दरवर्षी शेतकऱ्यांना ६,००० रुपये दिले जातात. मात्र, यावेळी सरकारने नियमात काही बदल केले आहेत. लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याकडे आता एक विशेष शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे आवश्यक आहे. जर तुमची केवायसी प्रक्रिया अपूर्ण असेल किंवा तुमच्याकडे शेतकरी आयडी नसेल तर तुमच्या खात्यात पुढील हप्त्याचे पैसे जमा होणार नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकरी अधिकृत पोर्टलवर जाऊ शकतात किंवा जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊ शकतात.

ई-केवायसी आणि शेतकरी आयडी का महत्त्वाचे?

सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी बंधनकारक केली आहे. अनेकदा चुकीच्या माहितीमुळे पात्र नसलेले लोकही या योजनेचा लाभ घेतात. हे रोखण्यासाठी ही पडताळणी केली जात आहे. नवीन शेतकरी आयडीमुळे तुमची सर्व शेतीविषयक माहिती सरकारकडे एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. त्यामुळे भविष्यात इतर सरकारी योजनांचा लाभ घेणेही सोपे होईल.

कोणत्या राज्यांमध्ये 'शेतकरी आयडी' अनिवार्य आहे?

केंद्र सरकारने देशातील अनेक महत्त्वाच्या राज्यांमध्ये हा नवीन नियम लागू केला आहे. यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांतील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे हप्ते विनाअडथळा मिळवण्यासाठी आपली नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

शेतकरी आयडी (Farmer ID) साठी नोंदणी कशी करावी?

शेतकरी आपल्या राज्याच्या अधिकृत कृषी पोर्टलवर जाऊन किंवा 'अॅग्रीस्टॅक' (AgriStack) या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आयडीसाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी आधार कार्ड (Aadhaar Card), आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि शेतीचा सातबारा किंवा जमिनीचा उतारा (Land Records) अनिवार्य आहे. तसेच या नोंदणी प्रक्रियेसोबतच ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करणे देखील गरजेचे आहे. तुम्ही स्वतः ऑनलाईन किंवा जवळच्या महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ईकेवायसी आणि फार्मर आयडी काढू शकता.

पैसे कधी जमा होणार आणि काय करावे?

२३ व्या हप्त्याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही, परंतु ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे लवकरच येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी 'पीएम किसान'च्या वेबसाईटवर जाऊन 'Beneficiary Status' तपासावे. तसेच, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यावी. कारण पैसे थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदीदारांना मोठा झटका! सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; पाहा तुमच्या शहरातील 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

Aishwarya Rai Video : Queen Is Back! ऐश्वर्या राय Cannes मध्ये चमकली; लेक आराध्याच्या लूकनं वेधलं लक्ष, सौंदर्य पाहून नेटकरी म्हणाले- "आई तशी लेक"

Accident News : बीडमध्ये मोठी दुर्घटना! विहिरीमध्ये ड्रिलिंग करताना दोन कामगारांचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार फिल्डिंग

Satara : घनदाट जंगलाच्या कुशीत वसलाय किल्ला, साताऱ्याला गेल्यावर 'हे' ऐतिहासिक ठिकाण नक्की फिरा

SCROLL FOR NEXT