Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : किती महिलांच्या खात्यात ₹१५०० चा हप्ता खटाखट जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

Ladki Bahin Yojana installment update : लाडकी बहीण योजनेत ईकेवायसीनंतर ५४ लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून त्यांचा १५०० रुपयांचा लाभ बंद झाला आहे. आता राज्यातील १.८९ कोटी महिलांनाच या योजनेचा फायदा मिळणार आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra Ladki Bahin Yojana eKYC rejected applicants details : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ईकेवायीसीनंतर ५४ लाख महिलांचे अर्ज बाद झाले आहेत. त्या सर्व माहिलांचा १५०० रूपयांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे. राज्यात एक कोटी ८९ लाख महिलांचा लाभ सुरू राहणार आहे. ईकेवायसीनंतर सरकारचे १२०० कोटी रूपये वाचणार असल्याचे एका रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडक बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी अंतिम केली आहे. पुढील काही दिवसांत मार्च, एप्रिल हप्त्याबाबत अपडेट समोर येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी ईकेवायसी अनिवार्य केली होती. ३० एप्रिल २०२६ पर्यंत लाडक्या बहि‍णींना ईकेवायसी करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आता अर्ज बाद झालेले, अथवा ईकेवायसी न केलेल्या महिलांची संख्या ५४ लाख असल्याचे समोर आले आहे. या ५४ लाख लाडक्या बहि‍णींना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार आहे.

किती महिलांना १५०० चा हप्ता मिळणार?

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर २ कोटी ४३ लाख महिलांनी यासाठी अर्ज केला होता. त्या सर्वांना सरकारकडून प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांचा लाभ दिला जात होता. पण कालांतराने सरकारकडून या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर लाखो महिलांचे अर्ज बाद झाले. ३० एप्रिल रोजी ईकेवासीची प्रक्रिया संपल्यानंतर लाभार्थी महिलांचा नवीन आकडा समोर आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता एक कोटी ८९ लाख महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे.

५४ लाख लाडक्या बहि‍णींचे अर्ज का बाद झाले?

  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त

  • वयाची अट

  • ईकेवायसी केलीच नाही अथवा चुकीची केली

  • कुटुंबातील सदस्य अथवा स्वत सरकारी नोकरीच कार्यकरत

  • घरात ४ चाकी गाडी

  • कुणाला मिळणार लाभ, कुणाचा बंद?

ईकेवायसीनंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांना यापुढे प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ मिळणार आहे. पण ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पात्र नसताना योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांकडून सरकार वसूली करण्याचा विचार करत आहे.

मार्च-एप्रिल महिन्याचा लाभ कधी मिळणार?

राज्यातील पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्यात अखेरचा १५०० रूपयांचा हप्ता मिळाला होता. पण त्यानंतर सरकारकडून कोणतीही अपडेट आली नाही. आता मे महिना उजाडला आहे. त्यामुळे लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर किती हप्त्याचे पैसे येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. काही सूत्रांच्या मते, लाडकीच्या खात्यावर दोन महिन्याचे ३००० रूपये एकत्र येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आरक्षणाचे संरक्षण व्हावं, शिक्षण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावं : सलीम सारंग

साकीनाका दुर्घटना प्रकरण; मुंबईकर जीवानं गेला, आमदार म्हणतात कट केला

Badlapur accident: मुलासोबत टिटवाळा गणपती दर्शनाला गेली, परतताना खड्ड्यात दुचाकी आदळली; भीषण अपघातात आईचा मृत्यू

Sakinaka Manhole: बीएमसीचे अधिकारी, मुंबईकरांचे मारेकरी? अधिकाऱ्यांना घरी पाठवा

Friday Horoscope: कामात संधी, प्रेमाची कबूली; या ६ राशीच्या लोकांना मिळणार गुड न्यूज, वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT