Ladki Bahin Yojana Saam TV Marathi News
बिझनेस

Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

Ladki Bahin Yojana June Installment Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या १५०० रुपयांच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पात्र महिलांच्या खात्यात पैसे २८ ते ३० जूनदरम्यान किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana, June installment update : राज्यातील कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या जून महिन्याच्या हप्त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. जून महिना संपण्यासाठी अवघे ६ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या महिन्याचे १५०० रुपये बँक खात्यात कधी जमा होणार? असा प्रश्न राज्यभरातील लाडक्या बहिणींना पडला आहे. या संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

जूनचा हप्ता कधी जमा होणार? Ladki Bahin Yojana June 2026 installment date

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे हप्ते दर महिन्याच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थेट बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केले जातात. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे एकत्रित दिल्यानंतर, मे महिन्याचा निधी १६ जून रोजी जारी करण्यात आला होता. त्यामुळे चालू जून महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता २८ ते ३० जून दरम्यान अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे.

'या' महिलांचे पैसे अडकू शकतात Maharashtra Ladki Bahin payment status check

योजनेचे पैसे नियमित येण्यासाठी सरकारने काही नियम कडक केले आहेत. ज्या महिलांचे पैसे अद्याप आलेले नाहीत किंवा पुढील हप्ता अडकू नये असे वाटत असेल, त्यांनी बँक खाते आधार लिंक आहे का? हे एकदा तपासून पहावे. तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhaar Seeded) असणे अनिवार्य आहे. खाते लिंक नसेल, तर सरकारी योजनेचे पैसे खात्यात जमा होत नाही.

जून महिन्याचा हप्ता कुणाला मिळणार? when will Ladki Bahin ₹1500 be credited

सरकारने ईकेवायसीद्वारे लाडकी बहीण योजनेची छाननी प्रक्रिया पार पाडली. या छाननी प्रक्रियेत अनेक बोगस आणि अपात्र असे ८० लाखांच्या आसपास अर्ज बाद केले आहेत. त्यामुळे केवळ पात्र महिलांनाच हा लाभ मिळणार आहे. राज्यातील पात्र महिलांची संख्या एक कोटी ७० लाखांच्या आसपास असल्याची माहिती मिळाली आहे. याच महिलांना जून महिन्याचा लाभ मिळणार आहे.

घरबसल्या असे तपासा तुमचे स्टेटस (Ladki Bahin Yojana Status) :

तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. महिला आपल्या मोबाईलवर 'नारीशक्ती दूत' ॲप किंवा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला (ladakibahin.maharashtra.gov.in) भेट देऊन आपल्या अर्जाची आणि बँक खात्याची स्थिती सहज तपासू शकतात. ( Ladki Bahin Yojana Status Check)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे? आणि काय खाऊ नये? वाचा पूर्ण लिस्ट

Taila Baila Fort : ३,३२२ फूट उंचीवरून शत्रूंवर नजर ठेवणारा 'तैलबैला' किल्ला पाहिलाय का? मुंबईपासून आहे जवळ

Veen Doghantali Hi Tutena : समरची एक चूक पडणार महागात; सुश्मिताला दिला घरातील मोठा हक्क, स्वानंदी पाहतच राहिली | VIDEO

SCROLL FOR NEXT