Ladki Bahin Yojana Saam Tv
बिझनेस

Ladki Bahin Yojana : फक्त एका जिल्ह्यात एक लाख २१ हजार लाडक्या बहिणी अपात्र, कारणही आले समोर; पाहा ₹१५०० चा लाभ का झाला बंद?

Ladki Bahin Yojana update : ईकेवायसी पडताळणीनंतर राज्यातील ७० लाखांहून अधिक महिलांचा लाडकी बहीण योजनेतील १५०० रुपयांचा लाभ बंद झाला आहे. अमरावती जिल्ह्यातच १.२१ लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून यामागील कारणे समोर आली आहेत.

Namdeo Kumbhar

when will Ladki Bahin May installment be credited : ईकेवायसीनंतर राज्यातील ७० लाखांपेक्षा जास्त महिलांचा लाडकी बहीण योजनेचा १५०० रूपयांचा हप्ता कायमचा बंद झाला आहे. आता प्रत्येक जिल्ह्यातील लाडक्या बहि‍णींचा पात्र अन् अपात्रेचा आकडा समोर येत आहे. या आकडेवारीनुसार एकट्या अमरावती जिल्ह्यातील तब्बल एक लाख २१ हजार महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे.

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत राज्यातील लाडक्या बहि‍णींना ईकेवायसीची मुदत देण्यात आली होती. यातील दुरूस्तीसाठी राज्य सरकारने एप्रिल २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर आता पडताळणी सरू असून अमरावती जिल्ह्यातील तब्बल १ लाख २१ हजार ८१८ महिलांचा लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

अमरावतीत लाडक्या बहि‍णींचा लाभ का बंद झाला?

अमरावती जिल्ह्यातील एक लाख २१ हजार ८१८ लाडक्या बहि‍णींचा १५०० रूपयांचा लाभ कायमचा बंद झाला आहे. हा लाभ बंद का झाला? याचे कारण समोर आले आहे. यामध्ये वयोमर्यादा, घरातील चारचाकी वाहन, केवायसी त्रुटी आदी कारणांचा समावेश आहे. त्याशिवाय अनेक महिलांनी एप्रिल अखेरपर्यंत ईकेवायसी केलीच नाही, त्यामुळेही लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद झाला आहे.

किती लाडक्य बहि‍णींना लाभ मिळणार ?

अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ६६,८१८, तर दुसऱ्या टप्प्यात आणखी ५५ हजार महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यात योजनेसाठी ७.२० लाख अर्ज मिळाले होते. त्यापैकी ६.९८ लाख महिलांना लाभ मंजूर झाला होता. यापुढेही अमरावतीमधील ६ लाख ९८ हजार लाडक्या बहि‍णींना १५०० रूपयांचा लाभ सुरू राहणार आहे.

लाभ बंद होण्याचं मुख्य कारण काय?

एका कुटुंबातील एकापेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचे पडताळणीत उघड झाले आहे. अमरावतीमध्ये ही संख्या ४९,४९३ इतकी आहे. लाभ बंद झाल्याने महिला व बालकल्याण विभागात लाभार्थी महिलांच्या तक्रारी व येरझारा वाढल्या आहेत. पण सध्या पडताळणी सुरू असल्याने आणखी किती महिलांचा लाडक्या बहीण योजनेचा लाभ बंद होणार याबाबत जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचे ३ हजार राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यानंतर आता मे महिन्यांचा हप्ता कधी जमा होणार? याकडे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार १० मे ते १५ मे यादरम्यान राज्यातील एक कोटी ७० लाख लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात एकनाथ शिंदेंचं वजन वाढणार? ऑपरेशन टायगर यशस्वी, बक्षीस काय? राज्यात भाजपच्या गोटात अस्वस्थता?

School Timing: रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल; एकाच सत्रात भरणार शाळा

Maha TET: राज्यातील सव्वा २ लाखांहून अधिक शिक्षक देणार ‘TET’ परीक्षा; हॉलतिकीट येथून करा डाऊनलोड

मोठी बातमी! माजी मंत्र्याच्या मुलाला ED कडून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

खासदार फुटीमागे कॉन्ट्रॅक्टर कनेक्शन? 'मराठवाड्यातील कॉन्ट्रॅक्टरनं खरेदी केले खासदार'

SCROLL FOR NEXT