EPFO Scheme Update News  google
बिझनेस

लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹25,000 बेसिक पगार असलेल्यांनाही मिळू शकतो पेन्शनचा लाभ; जाणून घ्या संपूर्ण अपडेट

EPFO Wage Ceiling : EPFO अंतर्गत वेतन मर्यादा ₹15,000 वरून ₹25,000 करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. मंजुरी मिळाल्याने लाखो कर्मचाऱ्यांना पीएफ आणि EPS पेन्शन योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

Sakshi Sunil Jadhav

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) अंतर्गत अनिवार्य वेतन मर्यादा (Wage Ceiling) १५,००० रुपयांवरून २५,००० रुपये करण्याच्या प्रस्तावावर विचार करत आहे. या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. अंतिम निर्णयासाठी तो केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे.

सध्या EPFO अंतर्गत बेसिक सॅलरी आणि महागाई भत्ता (DA) मिळून १५,००० पर्यंत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पीएफ आणि EPS मध्ये योगदान देणं बंधनकारक आहे. ही मर्यादा वाढवून २५,००० केल्याने जास्त सॅलरी असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांनाही पीएफ आणि पेन्शन योजनेता लाभ मिळू शकतो.

ही वेतन मर्यादा शेवटची सप्टेंबर २०१४ मध्ये बदलण्यात आली होती. जवळपास १२ वर्षांनंतर हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे संघटित क्षेत्रातल्या जास्त कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळावा, हा सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे.

हा नियम २० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या नोंदणीकृत कंपन्यांवर लागू होईल. याआधी श्रम मंत्रालय आणि EPFO यांनी ही मर्यादा ३०,००० करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र वित्त मंत्रालयाशी झालेल्या चर्चेनंतर २५,००० ही मर्यादा ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली.

या बदलामुळे कंपन्यांवरचा आर्थिक भार वाढण्याची शक्यता आहे. कारण जास्त कर्मचाऱ्यांसाठी नियोक्त्यांना पीएफमध्ये १२ टक्के योगदान द्यावं लागेल. तसेच कर्मचारी पेन्शन योजनेतील सरकारचे योगदानही वाढू शकतं. परिणामी, पीएफ खात्यात जमा होणारी रक्कम आणि त्यावरचे व्याजाचा लाभही वाढण्याची शक्यता आहे. मात्र सध्या हा प्रस्ताव अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन नियम लागू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT