Hyundai Grand I10 Cng Price: ह्युंदाईच्या गाड्या सध्या भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घालत आहेत. देशातील कंपनीची विक्री सातत्याने वाढत आहे. कार विक्रीच्या बाबतीत, कोरियन कार निर्माता ह्युंदाई जपानी मारुती सुझुकीपेक्षा थोडी कमी आहे.
यातच तुम्हीही ह्युंदाई कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते आहे. याचे कारण म्हणजे कंपनी आपल्या सर्वोत्तम मॉडेल Grand i10 Nios वर बंपर डिस्काउंट देत आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
कॉर्पोरेट, रोख सवलत आणि एक्सचेंज बोनस
Hyundai Grand i10 Nios वर बंपर सूट देत आहे. देशातील निवडक Hyundai डीलरशिप या महिन्यात Hyundai Grand i10 Nios वर सूट देत आहेत. यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सवलत यांसारख्या फायद्यांचा समावेश आहे. (Latest Marathi News)
Hyundai Grand i10 Nios वर या महिन्यात मिळत आहे सूट
Hyundai Grand i10 Nios वर 20,000 रुपयांपर्यंत रोख सूट मिळत आहे. याच्या एक्सचेंज बोनसबद्दल बोलायचे झाल्यास, या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. याशिवाय 3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट उपलब्ध आहे. तुम्ही ही कार खरेदी करणार असाल, तर तुम्ही आधी तुमच्या जवळच्या डीझरशिप किंवा ह्युंदाई शोरूममधून या ऑफरबद्दल चौकशी करावी. (Latest Auto News in Marathi)
किती आहे किंमत?
भारतातील Grand i10 Nios च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची किंमत 5.73 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. कार पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेनसह उपलब्ध आहे.
Hyundai Grand i10 Nios मध्ये मिळणार नवीन अपडेट
गेल्या महिन्यात Grand i10 Nios वर 6 आठवड्यांचा प्रतीक्षा कालावधी होता. हा प्रतीक्षा कालावधी मागणी आणि स्थानावर अवलंबून असतो. जो प्रत्येक राज्यानुसार भिन्न असू शकतो. मार्च 2023 मध्ये ब्रँडने हॅचबॅक लाइन-अपमध्ये Grand i10 Nios Sportz एक्झिक्युटिव्ह नावाचा एक नवीन प्रकार सादर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.