Pulsar NS160 Flex  Saam Tv
बिझनेस

Flex Fuel Bike: दिसायला कडक अन् चालवायला भारी; Bajaj ने आणली इथेनॉलवर धावणार नवीन Pulsar बाईक

Bharat Mobility Expo 2024: दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या बहुप्रतिक्षित फ्लेक्स-इंधन मॉडेलवर आधारित Pulsar NS160 सादर केली आहे.

Satish Kengar

Bharat Mobility Expo 2024:

दिल्ली येथे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान इंडिया मोबिलिटी एक्स्पो 2024 सुरू होता. यादरम्यान, दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने त्यांच्या बहुप्रतिक्षित फ्लेक्स-इंधन मॉडेलवर आधारित Pulsar NS160 सादर केली आहे. याव्यतिरिक्त कंपनीने डोमिनार 400 चे फ्लेक्स-इंधन मॉडेल देखील प्रदर्शित केले आहे.

म्हणजेच कंपनीच्या अपकमिंग बाईक पेट्रोलवर धावणार नाही तर फ्लेक्स-इंधनावर धावणार आहेत. यासाठी दोन्ही बाईकच्या इंजिनमध्ये बदल करण्यात आले आहेत. यानंतर ग्राहक इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर ही बाईक चालवू शकतील. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल नाही

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, Dominar 400 आता 27.5 टक्के इथेनॉल पेट्रोल मिश्रित इंधनावर धावणार आहे. Dominar E27.5 आधीच ब्राझीलसह 35 पेक्षा जास्त देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र बाईकच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Latest Marathi News)

Pulsar NS160 ची सध्याची (एक्स-शोरूम) किंमत भारतात 1.37 लाख रुपये आहे. तर Dominar 400 ची किंमत 2.30 लाख रुपये आहे. या दोन्ही बाईक्स भारतातील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

चेतक इलेक्ट्रिक स्कूटरही प्रदर्शन

दरम्यान, चेतक इलेक्ट्रिक स्कूटर देखील या एक्स्पोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या प्रसंगी बोलताना बजाज ऑटो लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक राकेश शर्मा यांनी सध्या सुरू असलेल्या एक्स्पोबद्दल उत्साह व्यक्त केला आणि ते म्हणाले, “आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी सतत नवीन उपक्रम राबवायचे आहेत. आम्ही फक्त पारंपारिक इंधनावर आधारित पर्यायांवर लक्ष केंद्रित केले नाही, तर पर्यायी उपायांवरही लक्ष केंद्रित केले. ते म्हणाले की, वाढत्या तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतेसह, आज बजाज ऑटो 90 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पायात काळा धागा का बांधला जातो? जाणून घ्या

Baramati News : अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले फलक; बारामतीत कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

डॉक्युमेंटरीचा वाद सुरू असतानाच Dhanush अन् Nayanthara यांची एकाच सोहळ्याला हजेरी, 'तो' व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Maharashtra Exit Poll : बेलापूर विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Exit Poll Maharashtra : शिवाजीनगरच्या आमदारपदी सिद्धार्थ शिरोळे? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT