Tata Nexon EV Saam Tv
बिझनेस

Best Selling Car: ग्राहकांची इलेक्ट्रिक वाहनांना पसंती! डिसेंबरमध्ये 'या' कारची सर्वाधिक विक्री; जाणून घ्या

Best Selling Car In 2023: देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस बाजारात या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. त्यात मागील वर्षी काही इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Best Selling Car In December 2023 Tata Nexon:

देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस बाजारात या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. त्यात मागील वर्षी काही इलेक्ट्रिक कारला ग्राहकांनी खूप जास्त पसंती दर्शवली आहे. त्यातील एक म्हणजे टाटा नेक्सॉन. टाटा नेक्सॉन ही गेल्या वर्षातील सर्वाधिक विक्री झालेली कार आहे.

टाटा नेक्सॉनने डिसेंबर महिन्यात तब्बल १५,२८४ युनिट्सची विक्री केली आहे. टाटा नेक्सॉनची सर्वाधिक विक्री झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात या कारचे जवळपास १४ हजार युनिट्स विकले गेले होते. त्यामुळे कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. (Latest News)

टाटा नेक्सॉन

टाटा नेक्सॉन ही सर्वाधिक विकलेली कार आहे. ही कार नवीन लूक आणि नवीन डिझाइनसह बाजारात उपलब्ध आहे. या नवीन कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठा टचस्क्रीन आणि 360-डिग्री कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, हवेशीर फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, व्हॉइस असिस्टेड सनरूफ आणि प्रीमियम फीचर्ससह बाजारात उपलब्ध आहे. या कारमध्ये ६ एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत.

किंमत

अपडेटेड टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कारमध्ये नवीन टचस्क्रिन आणि नवीन बॅटरी देण्यात आली आहे. ही नवीन स्टँडर्ड नेक्सॉन १.२ लीटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लीटर डिझेलसह येते. या नवीन अपडेटेड मॉडेलमध्ये AMT मॅन्युअर गिअरबॉक्ससह नवीन DCT गिअरबॉक्स जोडला गेला आहे. या कारची एक्स शोरुम किंमत ८.१० लाखांपासून सुरु होते. तर कारच्या इलेक्ट्रिक आवृत्तीची किंमत १४.७ ते १९.९ लाख रुपयांदरम्यान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT