UPS Saa, Yb
बिझनेस

Pension Schemes: ज्येष्ठ नागरिकांसाठी ५ जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार पेन्शन; वाचा सविस्तर

LIC SBI HDFC ICICI Pension Scheme: प्रत्येकाला आपल्या भविष्याची काळजी असते. त्यामुळे तुम्ही वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी या ५ योजना बेस्ट आहेत.

Siddhi Hande

ज्येष्ठ नागरिकांसाठी जबरदस्त योजना

या योजनांमध्ये दर महिन्याला मिळणार पेन्शन

एलआयसी, एचडीएफसी, स्टेट बँकेच्या योजना

प्रत्येकजण आपले म्हातारपण व्यवस्थित जावे, यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला जबरदस्त परतावा मिळतो. याचसोबत सेवानिवृत्तीनंतर दर महिन्याला पेन्शन मिळते. यासाठी तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायची असते. या ५ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळेल.

१. प्रधानमंत्री वय वंदन योजना (PM Vay Vandana Yojana)

ही योजना ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांसाठी सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना एकरकमी रक्कम जमा करायची आहे. यानंतर मासिक, तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर पेन्शन मिळते. या योजनेत तुम्ही १ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकतात. या योजनेत ७.४ टक्के व्याज मिळते.

२. एलआयसी जीवन शांती (LIC Jeevan Shanti Policy)

एलआयसी जीवन शांती ही सिंगल प्रिमियम योजना आहे. तुम्ही या योजनेत कमीत कमी १.५ लाखांपासून गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला गुंतवणूकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार आहे.

३. SBI लाइफ सरल पेन्शन योजना (SBI Saral Pension Yojana)

एसबीआय सरल पेन्शन योजनेत ६५ वयोगटापर्यंत गुंतवणूक करायची असते. या योजनेत सुरुवातीच्या पाच वर्षांसाठी गॅरंटीड बोनस दिला जातो. या योजनेत पहिल्या ३ वर्षासाठी २.५० टक्के तर २ वर्षांसाठी २.७५ बोनस मिळतो.

४. एसबीआय वीकेअर

स्टेट बँकेच्या वीकेअर योजना ही टर्म डिपॉझिट योजना आहे. या योजनेत ५ ते १० वर्षांसाठी मुदत ठेव करायची असते. या योजनेत ६.५० टक्के व्याजदर मिळते. या योजनेत दर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढले तर कमी परतावा मिळतो.

५. एचडीएफसी सीनियर केअर एफडी

एचडीएफसी सीनियर केअर एफडीमध्ये ७५ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना अतिरिक्त व्याजदर दिले जाते. ७ दिवस ते १० वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. यासाठी ३.५ टक्के ते ६.५ टक्के व्याजदर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT