Toyota Rumion Saam Tv
बिझनेस

Toyota Rumion कार भारतात लॉन्च, मोठ्या फॅमिलीसाठी आहे बेस्ट; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Toyota Rumion: देशातील आघाडीची कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या परवडणाऱ्या 7 सीटर कार Rumion चा नवीन ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च केला आहे.

Satish Kengar

Toyota Rumion:

देशातील आघाडीची कार उत्पादक टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपल्या परवडणाऱ्या 7 सीटर कार Rumion चा नवीन ऑटोमॅटिक व्हेरिएंट लॉन्च केला आहे. नवीन Rumion G AT व्हेरिएंटची एक्स-शो रूम किंमत 13 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

या कारची बुकिंग कंपनीने सुरु केली आहे. ग्राहक 11,000 रुपयांच्या टोकन रकमसह ही कार बुक करू शकतात. याची डिलिव्हरी 5 मे पासून सुरू होईल. या फॅमिली कारमध्ये निओ ड्राइव्ह (इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर-आयएसजी) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामुळे हिचा परफॉर्मन्स सुधारण्यास मदत होते. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

नवीन Toyota Rumion G AT व्हेरियंटमध्ये 1.5 लीटर के-सीरीज पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 103 hp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायासह येते. हे इंजिन एक लिटरमध्ये 20.11 किमी मायलेज देते. हेच इंजिन मारुती सुझुकीच्या गाड्यांमध्येही वापरले जाते.

या नव्या फॅमिली कारमध्ये सेफ्टीवर भर देण्यात आला आहे. यात EBD, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, हिल होल्ड, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टिमसह इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या कारच्या सीट खूप आरामदायी आहेत. नवीन Rumion मध्ये 7-इंचाची टचस्क्रीन ऑडिओ सिस्टम आहे. ही कार वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार प्ले सपोर्टने सुसज्ज आहे.

यात कनेक्टेड फीचर्सही उपलब्ध आहेत. ही कार रिमोटद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. नवीन Rumion मारुती सुझुकी एर्टिगा सारख्याच प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

SCROLL FOR NEXT