Success Story Saam TV
बिझनेस

Success Story : डॉक्टर झाल्या, पण चैन पडेना...तिसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IFS अपाला मिश्रा यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story of IFS Apala Mishra: अपाला मिश्रा यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी आधी डेंटिस्ट ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

Siddhi Hande

प्रत्येकाचे आयुष्यात काही न काही स्वप्ने असतात. ही स्वप्ने पूर्ण करताना अनेकदा काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय आपण घेतो. अनेकजण आपला अभ्यास करुन किंवा शिक्षण पूर्ण करुनही स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतात. आणि त्यात यशस्वी होतात. अनेकजण डॉक्टर, इंजिनियर होऊनदेखील यूपीएससी (केंद्रिय लोकसेवा आयोग) परीक्षा देतात. असंच काहीस अपाला मिश्रा यांनी केलं. त्या डॉक्टर झाल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

आयएफएस अपाला मिश्रा यांचा जन्म १९९७ रोजी उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे झाला. त्या आर्मी कुटुंबात जन्माला आल्या. त्यांचे वडील अमिताभ मिश्रा हे कर्नल आहेत. त्यांचे वडील अभिलेख मिश्रा हे सैन्यात मेजर आहेत. त्यांची आई अल्पना मिश्रा या दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर आहेत.

अपाला मिश्रा यांनी १०वीपर्यंतचे शिक्षण देहारादून येथे झाले. त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण दिल्ली येथून झाले. त्यानंतर त्यांनी आर्मी कॉलेजमधून बीडीएस केले. त्यानंतर त्यांनी डेंटिस्ट पदवी प्राप्त केली. त्यांना नेहमीच समाजासाठी काही काम करायचे होते. त्यामुळे त्यांनी सिविल सर्व्हिसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

आयएफएस अपाला मिश्रा यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. पहिल्या दोन प्रयत्नात त्या प्रिलियम्सदेखील पास करु शकल्या नाहीत. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी ९वी रँक मिळवली. त्यांनी यूपीएससी इंटरव्ह्यूमध्ये सर्वाधिक मार्क्स मिळवले होते.

आयएफएस (IFS) अपाला मिश्रा या सोशल मीडियावरदेखील फार सक्रिय आहेत. त्या परीक्षेच्या काळात ७-८ तास अभ्यास करायच्या. त्या आपल्या चुकांमधून शिकल्या. त्यांनी योग्य टाइम मॅनेजमेंट करत परीक्षा दिली आणि त्यात यशदेखील मिळवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा; शरद पवार गटानं टाकला मोठा डाव, पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Naneghat Waterfalls: मुसळधार पावसाने खुललं नाणेघाटाचं सौंदर्य; धबधबे, धुकं अन् हिरवाई अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

SCROLL FOR NEXT