Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी IPS होणाऱ्या ऐश्वर्या डोंगरे आहेत तरी कोण?

Success Story Of IPS Aishwarya Dongre: आयपीएस ऐश्वर्या डोंगरे यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं आहे.

Siddhi Hande

यूपीएससी परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु अनेकदा पहिल्याच प्रयत्नात अनेकांना यश मिळत नाही. परंतु महाराष्ट्राच्या ऐश्वर्या यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्या सध्या आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. (Success Story)

ऐश्वर्या डोंगरे या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या. त्यांनी मुंबईत आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यांना लहानपणापासूनच प्रशासकीय अधिकारी व्हायचे होते. तेव्हाच त्यांनी दृढ निश्चय केला होता.

ऐश्वर्या डोंगरे यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून बॅचलर ऑफ आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली.त्यानंतर इकोनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये पदवी घेतली. (Success Story of IPS AishwaryaDongre)

ऐश्वर्या यांना पहिल्यापासूनच यूपीएससी परीक्षा द्यायची होती. त्यांनी दिवसरात्र अभ्यास केला. ऐश्वर्या यांनी पहिल्याच परीक्षेत यूपीएससी परीक्षा क्लिअर केली.

कॉलेजमध्ये असतानाच ऐश्वर्या यांनी यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीला गेल्या.त्यांनी राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध या विषयांची निवड केली. त्यांनी चालू घडामोडी आणि मागील वर्षांच्या पश्नपत्रिकांचा अभ्यास केला. ऐश्वर्या यांनी वयाच्या २२ व्या वर्षी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे.

ऐश्वर्या यांची कामगिरी

ऐश्वर्या यांची पोस्टिंग शांघुमुघमध्ये होती. तेव्हा तिथे एका हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांनी एअरलिफ्ट केले होते. जिवंत हृदय प्रत्यारोपणासाठी तिरुवनंतपुरम ते कोचीपर्यंत एअरलिफ्ट यशस्वीरित्या पूर्ण केले होते. त्यांच्या आयुष्यात हा खूप चांगला प्रसंग आहे असे त्यांनी सांगितले होते.

ऐश्वर्या या त्यावेळी विमानतळाच्या एसपी म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी विमानतळापर्यंतच्या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर, केरळ पोलिसांचे हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय पथकाशी संपर्क साधला. त्यांनी जवळपास फक्त ३५ मिनिटांत हे जिवंत हृदय पोहचवण्याची किमया केली होती. त्यांच्या या कामाची सर्वत्र चर्चा झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT