कर्ज घेत असताना काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्या कागदपत्रांचा गैरवापर होणार नाही, याची दक्षता घेणं आवश्यक आहे. मागील वर्ष २०२३ मध्ये जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार, देशातील सायबर क्राइममध्ये वाढ झाली असून यात वेगवेगळे सायबर स्कॅमचे प्रकरणे समोर येत आहेत. यात आता लोन स्कॅमची यात भर पडलीय. या स्कॅमचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जर तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतलंय आहे का नाही, हे तुम्हाला तपासता येणार आहे. (Latest News)
स्कॅम करणारे लोक दुसऱ्याच्या नावावर कर्ज घेतात. जर तुमच्या नावावर कोणी कर्ज घेतलं असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकतात. तुमच्या नावावर किती कर्ज घेतलं गेलं आहे, याची तपासणी तुम्ही सिबील स्कोअरमधून तपासून शकतात. यात तुम्ही कर्जाचे तपशील आणि इतर तपशील जाणून घेऊ शकता. जर तुमच्या नावावर कोणतेही बनावट कर्ज असेल तर तुम्ही त्याची माहिती सिबिल स्कोअरवरून मिळवू शकता.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जेव्हा कोणी कर्ज घेण्याचा विचार करत असेल त्याला त्याचा सिबिल स्कोअर तपासावा लागतो. सिबिल स्कोअर हे त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती दाखवत असतं. जर सिबील स्कोअर चांगला असेल तर कर्ज लवकर मिळत असते. आपले सिबील स्कोअर हे तेव्हा खराब होत असते जेव्हा आपण कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल वेळेवर दिलं नाही तर सिबील स्कोअर खराब होत असते.
तुमचा सिबील स्कोअर नेहमी खराब राहिला तर तुमचं नाव डिफॉल्टरच्या यादीत जात असते. देशात अनेक क्रेडिट ब्युरो आहेत, तेथून तुम्ही तुमचा क्रेडिट रिपोर्ट विनामूल्य तपासू शकता. यासह अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत त्यातून तुम्ही सिबिल स्कोअर सहज तपासू शकता. बँकेच्या अॅप्लीकेशनवर सुद्धा तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर तपासू शकतात.
स्वस्त आणि पटकन लोन हवं असेल तर cibil स्कोअर महत्त्वाचं तुमचा सिबिल स्कोअर जितका चांगला असेल तितक्या सहजपणे तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळेल. सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला कर्ज मिळत नाही. अन्यथा, तुम्हाला कर्ज मिळण्यात खूप अडचणींना सामोरे जावे लागेल. ते मिळाले तर त्यासाठी बँकेला महागडे व्याज द्यावे लागेल.
सिबिल स्कोर कमी झाल्यामुळे कर्जासाठी अर्ज केला तर आपले कर्ज प्रकरण नाकारण्यात येते. जर कधी कर्जाचा अर्ज मान्य झाला तर आपल्याला अधिक व्याजदराने कर्ज दिले जाते. यामुळे आपली बँकिंग हिस्टरी नीट असणं आवश्यक आहे. यासाठी क्रेडिट कार्ड वापरताना योग्य काळजी घेतली पाहिजे. क्रेडिट कार्डचा उपयोग करताना नेहमी कार्डच्या वापरावर नियंत्रण ठेवावे. क्रेडिट कार्डचा वापर ३० टक्क्यांपेक्षा कमी असावा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.