Banking News  Saam Tv
बिझनेस

Banking News: गुड न्यूज! होम लोन स्वस्त, SBI सह २ बँकांचा मोठा निर्णय, कर्ज दरात मोठी कपात

State Bank Of India: स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या तिन्ही बँकांनी आपल्या ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांनी कर्ज दरात मोठी कपात केली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला.

Priya More

स्टेट बँक ऑफ इंडिया , बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. या तिन्ही बँकांनी कर्ज दरामध्ये २५ बेसिक पॉइंट्सने कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतला होता. आरबीआयच्या या निर्णयानंतर या तिन्ही बँकांनी आजपासून कर्जदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय घेतला. या बँकांच्या निर्णयामुळे विद्यमान आणि नवीन कर्जदारांसाठी कर्जे स्वस्त होणार आहेत.

कर्ज दर कपातीच्या नवीनतम टप्प्यासह एसबीआयचा रेपो लिंक्ड लेंडिंग रेट ८.२५ टक्क्यांपर्यंत कमी होणार आहे. एसबीआयने बाह्य बेंचमार्क आधारित लेंडिंग रेट (EBLR) देखील त्याच फरकाने ८.६५ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तसंच, आणखी एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने बँक ऑफ इंडियानेही अशीच कपात जाहीर केली आणि CIBIL स्कोअरच्या आधारे त्यांचा गृहकर्जाचा दर आता वार्षिक ७.९ टक्के असणार आहे.

गृहकर्जांव्यतिरिक्त एसबीआयने काही निवडक विद्यमान किरकोळ कर्ज उत्पादनांवरील व्याजदर २५ बेसिस पॉइंट्सने कमी केले आहे. ज्यामध्ये वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, मालमत्तेवरील कर्ज, शैक्षणिक कर्ज आणि स्टार रिव्हर्स मॉर्टगेज कर्ज यांचा समावेश आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे घरांवरील कर्जासह सर्वच कर्ज स्वस्त झाले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने त्यांची ४०० दिवसांची विशेष ठेव योजना मागे घेतली आहे जी ७.३ टक्के व्याजदर देत होती.

बँक ऑफ महाराष्ट्रने रेपो-लिंक्ड लेंडिंग रेट ९.०५ टक्क्यांवरून ८.८० टक्केपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने देऊ केलेले सर्व किरकोळ कर्ज RLLR शी जोडलेले असल्याने या कर्ज दर कपातीचा फायदा गृह, कार, शिक्षण, सोने आणि इतर सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होणार आहे.बँकेकडून देण्यात आलेले गृह कर्ज वार्षिक ७.८५ टक्क्यापासून सुरू होईल तर कार कर्जाची किंमत वार्षिक ८.२० टक्क्यांपासून असेल.

९ एप्रिल रोजी आरबीआच्या चलनविषयक धोरण समितीने रेपो दर ०.२५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्के केला. ही दोन महिन्यांमधील सलग दुसरी कपात होती. ज्यामुळे गेल्या दोन महिन्यांत रेपो रेट ५० बेसिस पॉइंट्सनी कमी झाले. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्जाचा हफ्ता कमी झाला त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT