Bank Strike Update meta ai
बिझनेस

Bank Strike Update : उद्यापासून ३ दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप, ATM - UPI ही बंद राहणार? महत्त्वाची अपडेट

Bank Strike September 28-30: २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान देशव्यापी बँक संप होणार आहे. शाखेतील कामकाज प्रभावित होऊ शकते.

Sakshi Sunil Jadhav

देशभरातल्या बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. २८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२६ या तीन दिवसांत देशव्यापी बँकेचा संप होणार आहे. युनायडेट फोरम ऑफ बँक युनियन्सने या हडतालची घोषणा केली आहे. त्यामुळे या काळात बँकेच्या शाखांमधील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र UPI, ATM आणि इंटरनेट बँकिंगसारख्या डिजिटल सुविधा बंद राहणार का, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.

२८ ते ३० सप्टेंबरदरम्यान संप

बँक युनियनच्या घोषणेनुसार २८, २९ आणि ३० सप्टेंबर रोजी संप होणार आहे. या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि ग्रामीण बँकांच्या शाखांमधील नियमित कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शाखेत जाऊन करायची महत्त्वाची कामे असतील तर ग्राहकांना अडचणी येऊ शकतात.

UPI बंद होणार का?

बँक संप म्हणजे UPI सेवा बंद होईल, असं नाही. UPI, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग सेवा सामान्यपणे सुरू राहण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे ग्राहक UPIद्वारे पैसे पाठवणे, QR कोडद्वारे पेमेंट करणे तसेच ऑनलाइन बिल भरणे यांसारखी कामं करू शकतात.

मात्र, तांत्रिक बिघाड किंवा सर्व्हरची समस्या उद्भवल्यास डिजिटल व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अत्यावश्यक व्यवहार शेवटच्या क्षणापर्यंत न ठेवणे योग्य ठरेल.

ATMमधून पैसे काढता येतील का?

संपाच्या काळात ATM सेवा सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, एखाद्या ATMमध्ये रोख रक्कम संपणे किंवा तांत्रिक समस्या निर्माण होणे शक्य आहे. त्यामुळे रोख पैशांची गरज असल्यास आधीच काही रक्कम काढून ठेवणे सोयीचे ठरू शकते.

कोणती कामे रखडू शकतात?

बँक शाखेत कर्मचाऱ्यांच्या मदतीने करावी लागणारी कामे प्रभावित होऊ शकतात. यामध्ये काउंटरवरून रोख रक्कम जमा करणे किंवा काढणे, चेकशी संबंधित कामे, काही KYC प्रक्रिया, कागदपत्रे जमा करणे आणि इतर शाखा-आधारित सेवा यांचा समावेश आहे.

त्यामुळे २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान शाखेत करावयाचे महत्त्वाचे काम असल्यास ते शक्यतो आधीच पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी सोयीचे ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT