Bank of Baroda Saam yandex
बिझनेस

Bank of Baroda ने सुरू केली BOB Parivar Accountची सुविधा; एका कुटुंबाचं एक बँक खातं, फायदे मिळतील अनेक

Bank of Baroda: बँक ऑफ बडोदाने आपल्या विशेष उपक्रम अंतर्गत एक नवीन सुविधा सुरू केलयी. ही सुविधा प्रत्येक कुटुंबासाठी उपयोगी ठरणार आहे. बीओबीने मेरा परिवार मेरा बँक या टॅगलाइन खाली परिवार सेव्हिंग अकाउंट ची सुविधा सुरू केलीय. यात एकाच परिवारातील ६ व्यक्ती आपले अकाउंट सुरू करू शकतात.

Bharat Jadhav

BOB Parivar Account:

बँक ऑफ बडोदाने आपली नवीन योजनेची घोषणा केलीय. यात एका कुटुंबाला बँक खाते उघडता येणार आहे. या योजनेतून ग्राहकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जाणार आहेत. 'बीओबी के संग त्योहार की उमंग' या आपल्या विशेष उपक्रम अंतर्गत बँकेने बीओबी परिवार अकाउंट योजना लॉन्च केलीय. या योजनेला बँकेने 'मेरा परिवार मेरा बँक' अशी टॅगलाइन दिलीय.(Latest News)

या बँक अकाउंटमध्ये एका कुटुंबातील सर्व सदस्यांचा समावेश केला जाईल. या बँक खात्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे खातं नियंत्रण करण्यास सोपं असणार आहे. यासह कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला किमान रक्कमेची शिल्लक ठेवण्याची गरज नाहीये. बँक खात्यातील कोणी एका व्यक्तीला ही रक्कम मेटेंन करावी लागेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बँक ऑफ बडोदाच्या एक परिवार खाते या योजनेत एका कुटुंबातील ६ सदस्यांना समाविष्ट करता येते. उदाहरणार्थ, यात पालक, सून-सासरे, मुले, सासरे-सासरे आणि सून-सून यांचा समावेश असू शकतो. भागीदारी, खासगी मर्यादित कंपन्या किंवा सहयोगी कंपन्याही BOBपरिवार बचत खाते योजनेचा लाभ घेऊ शकतात. दरम्यान हे खाते तीन प्रकारात असणार आहे. यातील बचत खात्यासाठी क्यूएबी (quarterly average amount)वेगळे आहेत.

डायमंड अकाउंटसाठी क्यूएबी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. तर गोल्डमध्ये २ लाख रुपयांपेक्षा जास्त क्युएबी आहे. तर सिल्वरमध्ये ५०,००० रुपयांपेक्षा जास्त क्युएबी असेल. तर चालू खात्यात डायमंडसाठी क्यूएबी १० लाख रुपयांपेक्षा जास्त क्युएबी तर गोल्ड खात्यांसाठी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त तसेच सिल्वरसाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त रुपयांची क्युएबी(तिमाही सरासरी रक्कम) असेल.

काय आहेत फायदे

  • यामध्ये खातेदाराला सवलतीच्या व्याजदराने किरकोळ कर्ज मिळते.

  • BOB परिवार बचत खात्यावर घेतलेल्या किरकोळ कर्ज घेत असताना कर्ज अर्जप्रक्रियेवर सूट मिळते.

  • या खात्यात बँक लॉकर भाड्यावर सवलत देखील उपलब्ध आहे.

  • खातेदाराने डीमॅट खाते उघडल्यास त्याला एएमसीवर सवलतही मिळते.

  • बँक मॅन्युअल एनईएफटी/आरटीजीएस शुल्कातही सवलत देते.

  • बँकेकडून घेतलेल्या डिमांड ड्राफ्टवर संपूर्ण सूट मिळते.

  • याशिवाय बँकेकडून घेतलेल्या चेकबुकवरही सवलत दिली जाते.

  • बँक ग्राहकाकडून एसएमएस, ई-मेल इत्यादीसाठी शुल्क आकारते. BOB परिवार बचत खाते धारकांना यावर सवलत देखील मिळते.

  • BOB परिवार बचत खातेधारकांना बाहेरगावी चेक कलेक्शन चार्जेसवरही सूट मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT