Bank Holidays Saam Tv
बिझनेस

Bank Holidays: २८ दिवसांचा महिना, ९ दिवस बँका बंद; फेब्रुवारीतील सुट्ट्यांची यादी वाचा

Bank Holidays in February 2026 List: फेब्रुवारी महिन्यात अनेक दिवस बँका बंद असणार आहेत. वीकेंड आणि सणानिमित्त सुट्टी बंद असणार आहे.

Siddhi Hande

फेब्रुवारीतील बँकांच्या सुट्ट्यांची यादी

इतके दिवस बँका राहणार बंद

बँकेत जाण्याआधी सुट्ट्यांची यादी वाचा

जानेवारी महिना संपत आला आहे. आता फेब्रुवारी महिन्यात बँकांना अनेक सुट्ट्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात जर तुमचे बँकेत काही काम असेल तर आताच यादी चेक करा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी महिन्याच्या अधिकृत सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शनिवार-रविवार आणि काही सणासुदीच्या सुट्ट्या असणार आहे.

फेब्रुवारीत बँका किती दिवस बंद असणार? (Bank Closed In February List)

फेब्रुवारी महिन्यात काही दिवस देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे. प्रत्येक राज्याच्या सणांनुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असणार आहेत. त्यामळे तुमचे जर बँकेत काही काम असेल तर सुट्ट्यांची यादी पाहून जा. अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

फेब्रुवारी महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी (Bank Holiday in February)

१ फेब्रुवारी (रविवारी)- रविवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

१४ फेब्रुवारीला दुसऱ्या शनिवारी देशातील बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

१५ फेब्रुवारीला रविवारमुळे बँक बंद असणार आबे.

२२ फेब्रुवारीला रविवारमुळे देशातील बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

२८ फेब्रुवारी चौथ्या शनिवारी देशातील सर्व बँकांना सुट्टी असणार आहे.

सणांना सुट्ट्या (Bank Holiday For Festival)

फेब्रुवारी महिन्यात अनेक सण उत्सव आहेत. त्यामुळेदेखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

१५ फेब्रुवारीला महाशिवरात्रीनिमित्त आंध्र प्रदेश, बिहार,महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुट्टी असणार आहे.

१८ फेब्रुवारी रोजी सिक्कीममध्ये लोसारनिमित्त सुट्टी असणार आहे.

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रातील सर्व बँका बंद राहणार आहेत.

२० फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममध्ये राज्य स्थापना दिवसनिमित्त बँका बंद असणार आहे.

बँका बंद असल्या तरी या सर्व्हिस सुरु

फेब्रुवारी महिन्यात बँकांना सुट्टी असली तरीही ऑनलाइन सर्व्हिस सुरु राहणार आहेत. यूपीआय, एटीएम, इंटरनेट बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. दरम्यान, फक्त ब्रँचसंबंधित काही कामे असतील तर ती होणार नाहीत. यामध्ये तुम्हाला पासबुक प्रिंट, कॅश डिपॉझिट अशी कामे होणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Tourism : फॅमिली ट्रिपसाठी पनवेलजवळील सुंदर लोकेशन, वीकेंडला 'येथे' होते पर्यटकांची गर्दी

Maharashtra Live News Update: महिलांच्या डब्यात बुरखा घालून फिरणारी व्यक्ती रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Thursday Horoscope: कामाच्या ठिकाणी राहा सावध, 5 राशींची होणार चांदीच चांदी; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Navi Mumbai: पाढे पाठ नसल्याने दिली भयंकर शिक्षा, शिक्षिकेने विद्यार्थिनीला उलाथन्याने दिले ४० फटके

अजित पवारांच्या प्रेमकोर्ट बंगल्यावरील विलीनीकरणाच्या चर्चेत सुनील तटकरेही? खरं काय आणि खोटं काय? VIDEO

SCROLL FOR NEXT