Bank Holiday Saam Tv
बिझनेस

Bank Holiday : ईदची सुट्टी रद्द, आजपासून ३१ मार्चपर्यंत बँका कधी बंद राहणार? आताच नोट करा

Bank Holiday 2025: रिझर्व्ह बँकेने ३१ मार्चची बँक सुट्टी रद्द केली असून, २९ मार्चला बँका खुल्या राहतील. ग्राहक डिजिटल आणि नेट बँकिंग सेवा वापरून आर्थिक व्यवहार करू शकतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. रिझर्व्ह बँकेने पुढच्या काही दिवसांच्या सुट्ट्यांबद्दल माहिती दिली आहे. २७ ते ३१ तारखेपर्यंत देशातील काही बँकांना सुट्टी राहणार आहे. वीकेंड आणि रमझान असल्याने या सुट्ट्या असणार आहेत. मात्र, रिझर्व्ह बँकेने ३१ मार्चची सुट्टी रद्द केली आहे. आर्थिक वर्षाचा हा शेवटचा दिवस असल्याने हा निर्णय घेतला आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षांशी निगडीत सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांना कामावर यावे लागणार आहे. दरम्यान, आज आणि उद्या जम्मू काश्मीरमधील बँका बंद राहणार आहेत. २९ मार्च शनिवारी बँका बंद असतील अस अनेकांना वाटत आहे. मात्र, २९ तारखेला पाचवा शनिवार असल्याने बँका खुल्या राहणार आहेत. त्यामुळे फक्त १ दिवस रविवारी बँका बंद राहणार आहे.

रिझर्व्ह बँकेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिल रोजी बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. रिझर्व्ह बँकेने सुरूवातीच्या काळात ३१ मार्चला बँक हॉलिडे जाहिर केला होता, परंतु २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने आणि वर्षातील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची अंतिम तारीख असल्याने ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

बँक सुट्ट्यांच्या दिवशी कोणत्या बँकिंग सेवा उपलब्ध असतील?

ग्राहक वर्षभरासाठी डिजिटल किंवा नेट बँकिंग सेवा वापरू शकतात, जोपर्यंत बँक कोणतीही सुचना देत नाही. अन्यथा, सर्व बँक वेबसाइट्स, बँकिंग अ‍ॅप्स, UPI आणि ATM सेवा वर्षभर सक्रिय राहतील. अशा दिवशी तुम्ही डिजिटल पद्धतीने फिक्स्ड डिपॉझिट किंवा रिकरिंग डिपॉझिट देखील सुरू करू शकता.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT