Saam Tv
बिझनेस

Banking News: रविवार असताना बँका सुरू, आजच करा महत्वाची कामं; पुढचे ३ दिवस राहणार बंद

Bank Holiday Alert: रविवार असताना आज देशभरातील बँका सुरू आहेत. पुढचे ३ दिवस सलग बँका बंद राहणार आहेत त्यामुळे ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. याचमुळे आज बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

Priya More
  • रविवार असताना आज बँका सुरू

  • बँका सुरू असल्याने आजच करून घ्या काम

  • २८ ते ३० सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला

  • बँक संपामुळे सेवा प्रभावित होऊ नये यासाठी आज बँका राहणार सुरू

आज रविवार असूनही देशभरातील सर्व बँका सुरू आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेशी संबंधित कामं आज करता येणार आहेत. बँक कर्मचारी संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान पुकारलेल्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर आज बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपाच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व बँका सुरू ठेवण्याचे निर्देश वित्त मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. संपाआधी आज बँका सुरू असल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला.

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान ३ दिवसांच्या देशव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे सलग ३ दिवस बँकांच्या शाखांमधील सेवा प्रभावित होण्याची शक्यता आहे. २५ सप्टेंबरला गणपती विसर्जनानिमित्त सुट्टी होती, २६ सप्टेंबरला चौथा शनिवार आणि २७ सप्टेंबरला रविवार असल्याने बँकांना सुट्टी होती. सलग पाच दिवस बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे २७ सप्टेंबरला रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवार, शनिवारी आणि रविवारी सुट्टी आल्यामुळे अनेकांना बँकेशी संबंधित रखडलेली कामं आज पूर्ण करता आले नाही. त्याचसोबत सोमवार, मंगळवार आणि बुधवारी संपामुळे बँका बंद राहणार असल्यामुळे ज्यांनी या दिवशी बँकेसंदर्भातील कामं करण्याचा प्लान केला आहे त्यांनी आजच ते काम पूर्ण करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. सलग ५ दिवस बँकांच्या संबंधित सेवा प्रभावित झाल्यानंतर थेट १ ऑक्टोबरपासून व्यवहार नियमित होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे २ ऑक्टोबरला देखील बँकांना सुट्टी असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या कामावर पुन्हा परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, २१ सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, इंडियन बॅक्स असोसिएशन आणि नाबार्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली होती. या बठैकीमध्येच सरकारने रविवारी २७ सप्टेंबर रोजी बँका सुरू ठेवण्याचे आदेश सर्व बँकांना दिले होते. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने २७ सप्टेंबर रोजी बँक शाखा, कार्यलये, करन्सी चेस्ट आणि एटीएम संलग्न शाखा सुरू ठेवण्यास मंजुरी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT